'तारक मेहता'मध्ये दिशाऐवजी येणार नवीन दयाबेन!

वृत्तसंस्था
Wednesday, 3 July 2019

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या हिंदी विनोदी मालिकेतील अभिनेत्री दिशा वाकानी अर्थात दयाबेन गडा यांच्या जागी आता नवीन दयाबेन येणार आहे. विभूती शर्मा असे त्यांचे नाव. 

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या हिंदी विनोदी मालिकेतील अभिनेत्री दिशा वाकानी अर्थात दयाबेन गडा यांच्या जागी आता नवीन दयाबेन येणार आहे. विभूती शर्मा असे त्यांचे नाव. 

दिशा वाकानी गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत दिसत नाहीये. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून मोठी निराशा व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांच्या 'कमबॅक'साठी चाहते आग्रही आहेत. मात्र, आता दिशा वाकानी परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या जागी विभूती शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. 

दयाबेनचे जाणार हे निश्चित झाल्यानंतर 'तारक मेहता'च्या निर्माते, दिग्दर्शकांकडून गेल्या काही दिवसांपासून ऑडिशन घेण्यात येत होते. त्यानंतर आता विभूती शर्माला फायनल करण्यात आले आहे. निवड निश्चित झाली असली तरीदेखील विभूतीने यासाठी साईन केलेले नाही. मात्र, आता लवकरच नवीन दयाबेन प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे निश्चित झाले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vibhuti Sharma Replace Dayaben Disha Vakani in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah