'तू भेटलीस आता आणखी' सारा सोबतचा चित्रपट रिलिज झाल्यानंतर विकीचं बायकोवर प्रेम उतू Vicky-Katrina |Vicky Kaushal and Katrina Kaif | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vicky Kaushal and Katrina Kaif:

Vicky-Katrina: 'तू भेटलीस आता आणखी' सारा सोबतचा चित्रपट रिलिज झाल्यानंतर विकीचं बायकोवर प्रेम उतू

Vicky Kaushal and Katrina Kaif: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान यांचा 'जरा हटके जरा बचके' चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

काहींना हा चित्रपट फुल मनोरंजक वाटला तर काहींना हा चित्रपट निव्वळ टाईमपास वाटला आहे.

या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरी या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेकश्न चांगले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.49 कोटींची कमाई केली आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशन सारा आणि विकीने काहीच कसर सोडली नव्हती. या चित्रपटाचे बऱ्याच दिवसांपासून प्रमोशन सुरू होते.

जवळपास सर्वच राज्यात दोघांनी या चित्रपटाचे प्रमोशन केले. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघही आपल्या घरी गेले आहे. त्यातच विकी आता त्याच्या मुंबईतील घरी पोहोचला आहे.

आता विकीची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफने देखील तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पतीच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाचं प्रमोशन केले आहे.

या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत तिनं तिच्या चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

कतरिनाने चित्रपटाच्या पोस्टरसोबत लिहिले की, हा चित्रपट खूप प्रेमाने बनवला गेला आहे. यासोबत तिने चित्रपटाच्या टिमला अभिनंदन केले आहे.

Vicky Kaushal and Katrina Kaif

Vicky Kaushal and Katrina Kaif

कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये ती आणि सारा अली खान दिसत आहेत. कतरिनाने कॅप्शनमध्ये लिहिले, आता थिएटरमध्ये. संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन.

Vicky Kaushal and Katrina Kaif

Vicky Kaushal and Katrina Kaif

आता बायकोनं कौतुक केलं म्हटल्यावर विकी कुठ मागे राहणार. त्याने कतरिनाची पोस्ट शेयर करत "तू है तो मुझे फिर और क्या चाहिये!" हे त्याच चित्रपटातील गाण्याचे बोल शेयर करत तिला ते गाणं पोस्ट केलं आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट कपिल आणि सौम्या या इंदूरमधील सुखी विवाहित जोडप्याभोवती फिरतो. दोघेही एकत्र कुटुंबात राहतात आणि त्यानंतर दिवशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडत आहे. तर चाहते विकी कौशलच्या अभिनयाचंही खुप कौतुक करत आहे.