विकी कौशलला दुखापत, पडले 13 टाके 

वृत्तसंस्था
शनिवार, 20 एप्रिल 2019

विकीला एका गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. चित्रपटातील साहसी दृश्यांचे चित्रीकरण करताना विकी गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्या गालाच्या हाडाला मार लागला असून तब्बल 13 टाके पडले आहेत. 

'उरी' फेम विकी कौशल आता एका थरारपटात दिसणार आहे. दिग्दर्शक भानू प्रताप सिंह दिग्दर्शित या थरारपटाचे काम जोरात सुरू आहे. पण या चित्रीकरणावेळी विकीला एका गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. चित्रपटातील साहसी दृश्यांचे चित्रीकरण करताना विकी गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्या गालाच्या हाडाला मार लागला असून तब्बल 13 टाके पडले आहेत. 

सध्या गुजरातमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. अलंग येथील शिपयार्डमध्ये विकीला दुखापत झाली. यात चित्रीकरणात विकीला धावत जाऊन दरवाजा उघडायचा होता. पण नेमका हाच दरवाजा त्याच्या अंगावर पडला आणि त्याला जोरात लागले. यानंतर त्याला स्थानिक रूग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले. 

या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत असून यात भूमी पेडणेकरची महत्त्वाची भूमिका आहे. पुढील चित्रीकरण सुरू होण्यासाठी काही दिवस तरी लागतील. तर विकीच्या चाहत्यांनी त्याच्या या दुखापतीमुळे हळहळ व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vicky Kaushal injured while shooting a movie