esakal | Video: जामवालचा 'विद्युत' झटका, एलईडीची स्क्रीन फोडून दमदार इंट्री
sakal

बोलून बातमी शोधा

Video: जामवालचा 'विद्युत' झटका, एलईडीची स्क्रीन फोडून दमदार इंट्री

Video: जामवालचा 'विद्युत' झटका, एलईडीची स्क्रीन फोडून दमदार इंट्री

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) आपल्या स्टंटबाजीमुळे विद्युतचा (vidyut jamwal) चांगलाच बोलबाला आहे. त्यानं आतापर्यत सर्वात प्रभावी अॅक्शन हिरो म्हणूनही लोकप्रियता मिळवली आहे. सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सुपर अॅक्शन हिरो म्हणूनही त्याची लोकप्रियता आहे. त्याच्या वाट्याला येणारा चाहत्यांचा प्रतिसाद देखील मोठा आहे. चाहत्यांना नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची ट्रीट देणाऱ्या विद्युतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याला नेहमीप्रमाणे चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्या व्हिडिओमध्ये विद्युतनं काही स्टंट दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'सनक' या होस्टेज ड्रामाच्या प्रदर्शनाआधी, विद्युत जामवालने आज लाईव्ह सादर केलेल्या हाई-ऑक्टेन ऍक्शनने सगळ्यांना थक्क केले.

बहुप्रतीक्षित एंटरटेनर 'सनक - होप अंडर सीज'च्या अधिकृत ट्रेलरचे काउन्ट डाउन सुरू झाले असून लवकरच डिझ्नी+ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. मात्र, त्याआधी विद्युतने एका जळत्या एलईडी स्क्रीनला तोडत कार्यक्रमात बहारदार एंट्री घेतली आणि दर्शकांना चकित केले. या निमित्ताने 'सनक'च्या निर्मात्यांनी उपस्थित सर्वांना लाईव्ह ऍक्शनचा अनुभव दिला ज्यामध्ये विद्युत जामवालला जवळून बघण्याची संधी मिळाली, जेव्हा अभिनेत्याने स्क्रीनचा चक्काचूर करत एक हीरोइक एंट्री घेतली.

विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये डेब्यु करणारी बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा अभिनीत, 'सनक - होप अंडर सीज' झी स्टूडियोजद्वारे सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात येत असून 15 ऑक्टोबरपासून केवळ डिज्नी+ हॉटस्टार मल्टीप्लेक्सवर स्ट्रीम करेल. हा विपुल अमृतलाल शाह प्रोडक्शनचा चित्रपट असून याचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केले आहे. कनिष्क वर्मा यांच्याद्वारे दिग्दर्शित 'सनक'मध्ये प्रेक्षकांसमोर एक अशी शैली सादर करण्यात आली आहे, जिला अजूनपर्यंत जास्त एक्सप्लोर करण्यात आलेले नाहीये. या चित्रपटात विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि बंगाली स्टार रुक्मिणी मैत्रा दिसणार आहे, जी या होस्टेज ड्रामासोबत बॉलीवुडमध्ये पदार्पण करत आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याविषयी विद्युत म्हणतो,

हेही वाचा: विद्युत जामवालचा 'सनक' डॅशिंग लूक व्हायरल!

हेही वाचा: Drugs case: आर्यन खानच्या सेल्फीमधील 'तो' मिस्ट्री मॅन कोण?

“सनकसोबत आम्ही दर्शकांसाठी एड्रेनालाईन अनुभव देण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याद्वारे आधी करण्यात आलेल्या सर्व एक्शन दृश्यांपेक्षा हटके काही करणे रोमांचक होते. तुम्हाला 'सनक' अवश्य पाहायला हवी आहे आणि सोबतच प्रेमासाठी सनकी माझी भूमिका देखील."

loading image
go to top