esakal | कारच्या छतावर उभा राहिला 'बाजीराव' चाहत्यांचा पडला गराडा
sakal

बोलून बातमी शोधा

video viral Ranveer singh with grey hoodie shorts people surrounding his car

रणवीरला भेटायला येणा-या चाहत्यांना त्याचे त-हेवाईक वागणे चांगलेच ठाऊक आहे. त्यासाठी तो प्रसिध्द आहे. विशेष म्हणजे आपल्याला भेटायला आलेल्या चाहत्यांना तो कधीही नाराज करत नसल्याचे दिसून आले आहे. 

कारच्या छतावर उभा राहिला 'बाजीराव' चाहत्यांचा पडला गराडा

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - मोस्ट एनर्जीटीक अभिनेता म्हणून रणवीर सिंहचे नाव घेतले जाते. त्यासाठी तो प्रसिध्दही आहे. त्याच्या अभिनयातील, नृत्यातील सळसळता उत्साह हा नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. रणवीर त्याच्या अँटिक वागण्यामुळेही चर्चेत राहणारा अभिनेता आहे.  त्याने नुकत्याच एका हटक्या अंदाजात चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणा-या रणवीरने आपल्या अनोख्या अंदाजाने चक्रावून टाकले आहे.  यावेळी त्याने आपल्या कारच्या छतावर उभे राहून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.रणवीरला भेटायला येणा-या चाहत्यांना त्याचे त-हेवाईक वागणे चांगलेच ठाऊक आहे. त्यासाठी तो प्रसिध्द आहे. विशेष म्हणजे आपल्याला भेटायला आलेल्या चाहत्यांना तो कधीही नाराज करत नसल्याचे दिसून आले आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रणवीरच्या एका व्हिडीओमध्ये त्याने समुद्रकिनारी आलेल्या आपल्या फॅन्सला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रणवीरने कारच्या छतावर उभे राहून चाहत्यांना सावधानता व आरोग्यविषयक योग्य ती काळजी घेऊन दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्याच्या कारच्या भोवती चाहत्यांचा गराडा पडल्याचे दिसून आले. ग्रे रंगाची हुडी आणि शॉर्ट घातलेल्या रणवीरची छबी टिपण्यासाठी फॅन्सची गडबड सुरु होती. रणवीरनेही चाहत्यांना शुभेच्छा देत असल्याचा फोटो सोशल मीडियावर शेयर केली आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे जरुरीचे आहे. मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, दरवेळी सॅनिटाईजचा वापरण्याचे आवाहन त्याने य़ावेळी केलं.

चाहत्यांनीही त्याला हात उंचावून हॅप्पी दिवाळी असे म्हणून शुभेच्छा दिल्या. ब-याच दिवसानंतर दीपिका आणि रणवीर शुटींगच्या निमित्ताने बाहेर पडले आहेत. ते सेटवर असल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. रणवीर हा आता त्याच्या 83 नावाच्या चित्रपटातून झळकणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. यात रणवीरने भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका केली आहे. तर दीपिकानं त्यांची पत्नी रोमी हिची भूमिका साकारली आहे. 
 
 
 

 
 

loading image
go to top