esakal | दानशुर विद्या, कोरोना वारियर्सना दिले 1 हजार PPE KIT

बोलून बातमी शोधा

Vidya balan decided
दानशूर विद्या, कोरोना वारियर्सना दिले 1 हजार PPE KIT
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सरकारने लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. काही रूग्णालयात वैद्यकीय सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात अनेक ठिकाणी लस, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर्स या वैद्यकीय सुविधांची कमतरता भासू लागली आहे. रूग्णांची संख्या वाढत असून अपूऱ्या वैद्यकिय सुविधांमुळे अनेक रूग्णांनी जिव गमावला आहे. कोरोनाच्या या वाढत्या रूग्ण संख्येमुळे अनेक सेलिब्रेटींनी मदत कार्य हाती घेतले आहे. बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री विद्या बालनने नुकताच कोरोना रूग्णासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

विद्याने कोरोना वारियर्सना 1000 पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (पीपीई) किट डोनेट केले आहेत. विद्या सध्या हे मदत कार्य दृश्यम चित्रपटाचे निर्माते मनीष मुंद्रा आणि फोटोग्राफर सह- निर्माता अतुल कस्बेकर यांच्यासोबत करत आहे. याबाबत विद्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मदत कार्यासाठी ज्यांने विद्याने मदत केली त्याचे तिने आभार मानले आहेत. तसेच विद्याने या व्हिडीओमध्ये तिला ज्यांनी या कार्य़ासाठी मदत केली आहे त्यांच्या पैकी एका व्यक्तिला व्हिडीओ कॉलवर तिच्यासोबत बोलण्याची संधी मिळेल, असे सांगितले. व्हिडीओमध्ये विद्याने सांगितले की तिने जे पीपीई किट कोरोना वारियर्सना दिले आहे त्या एका किटची किंमत 650 रूपये आहे.

काही दिवसांपूर्वी विद्याने सोशल मीडियावर ब्लाऊज पिसपासून मास्क तयार करण्याचा व्हिडीओ शेअर केली. त्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. विद्याने हाती घेतलेल्या या मदत कार्याबद्दल तिचे विद्याचे चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत.