विद्या बालनने बनविला तिचा आवडता महाराष्ट्रीयन पदार्थ...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

विद्याने तर पहिल्यांदाच स्वयंपाकघरात पाऊल टाकलं आहे आणि तिने चक्क एक महाराष्ट्रीयन पदार्थ बनवला आहे. विद्या तिच्या स्वयंपाकघरात मोदक बनवत आहे. तिचा हा सगळ्या आवडता पदार्थ आहे.

मुंबई ः स्वयंपाकघरातील तसेच घरातील साफ-सफाई करतानाचे व्हिडिओज्, फोटोज् सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट केले. अन् मग काय नेटकऱ्यांनाही हा त्यांचा नवा अवतार पाहून गंमत वाटू लागली. आपले लाडके कलाकार सर्वसामान्यांसारखेच घरात काम करत आहेत हे पाहून अनेकांना नवल वाटलं. क्वारंटाईन वेळात काय केलं पाहिजे हे सांगण्याचा  खरं तर या सेलिब्रिटींचा उद्देश होता. लॉकडाऊनचा एक फायदा झाला तो म्हणजे बरेच कलाकार स्वयंपाकघरात पहिल्यांदा गेले. विविध प्रकारच्या रेसिपी शिकले. अजूनही आपल्या कुटुंबियांसाठी ही मंडळी नवनवीन पदार्थ बनवत आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. 

हे ही वाचा ; शाहरुख खानने आपल्या ऑफिसचा कायापालट केला, तो कशासाठी ते तुम्ही पाहाच

विद्याने तर पहिल्यांदाच स्वयंपाकघरात पाऊल टाकलं आहे आणि तिने चक्क एक महाराष्ट्रीयन पदार्थ बनवला आहे. विद्या तिच्या स्वयंपाकघरात मोदक बनवत आहे. तिचा हा सगळ्या आवडता पदार्थ आहे.सध्या विद्याचा मोदक बनवतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. `मी कधीच स्वयंपाक केला नाही. पण गेले दोन ते तीन दिवस वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्यातीलच हा एक पदार्थ म्हणजे मोदक. मला मोदक प्रचंड आवडतो. आणि तोच बनवण्याच्या मी प्रयत्नात आहे.` असे विद्याने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 

अगदी परफेक्ट आकाराचे मोदक तिने बनवले आहेत. क्वारंटाईन वेळामध्ये काहीतरी नवनवीन शिकण्याचा प्रयत्न सध्या विद्या करत आहे. नेहमीच्या चित्रीकरणाच्या गडबडीत तिचं स्वयंपाक घरात कधी जाणं झालंच नाही. आता लॉकडाऊनमुळे स्वयंपाक शिकण्याची तिला संधी मिळाली आहे. प्रत्येक पदार्थ परफेक्ट बनविण्यासाठी विद्या धडपडत आहे.  कतरिना कैफ, कार्तिक आर्यन सारखे कलाकारही घरात काम करतानाचे व्हिडिओ, फोटो पोस्ट करत आहेत. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण हे क्युट कपल तर एकमेकांसाठी विविध पदार्थ बनवत आहेत. काही कलाकार आपल्या मुलांबरोबर खेळण्यात रमले आहेत. तर काही आपल्या जवळच्या माणसांसाठी हेअरस्टायलिस्ट बनले आहेत. या लॉकडाऊनने भल्या भल्या कलाकारांना स्वयंपाक करायला शिकवलं आहे. सततच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या कुटुंबियांसाठी काही ना काही तरी नव्या गोष्टी करण्याची संधी सेलिब्रिटींना मिळाली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidya balan making modak which is also her favorite dish