विद्या बालनच्या 'नटखट' सिनेमाचा ग्लोबल फेस्टिवलमध्ये आज होणार प्रिमियर

NATKHAT
NATKHAT

मुंबई- अभिनेत्री विद्या बालनची निर्मिती असलेल्या नटखट या पहिल्या वहिल्या सिनेमाचा प्रिमियर आज ग्लोबल फेस्टीवलमध्ये होणार आहे. विद्या बालन आता अभिनेत्रीसोबतंच निर्माती देखील बनली आहे. विद्याने नटखट नावाची एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. ही शॉर्ट फिल्म आज वी.आर.वन- अ ग्लोबल फेस्टिवल या डिजीटल फेस्टिवल सोहळ्यात प्रदर्शित केली जाणार आहे.

विद्या बालनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या सिनेमाचं पोस्टर शेअर करत माहिती दिली आहे. विद्याने लिहिलंय, 'कोविड-१९ या जागतिक संकटामुळे जगभरातले फिल्म फेस्टिवल रद्द झाले आहेत.या दरम्यान वी.आर.वन सारख्या डिजीटल फेस्टिवलवर प्रेक्षकांच्या आणि निर्मात्यांच्या अपेक्षा आहेत. या प्लॅटफॉर्मवर मी माझा सिनेमा आणून आनंदी आहे आणि उत्साही देखील.'

'नटखट' हा सिनेमा अशा मुद्दयावर बनला आहे जो सार्वजनिकरित्या खूप महत्वाचा आहे. यात आम्ही एक मोठा सामाजिक संदेश देखील दिला आहे. डिजीटल सिनेमांचा हा फेस्टिवल युट्युबवर १० दिवसांकरिता आयोजित करण्यात आला आहे.

यात मुंबई फिल्म फेस्टिवल व्यक्तिरिक्त बर्लिन, कान, वेनिस, टोरंटो, न्यूयॉर्क, बीएफआय लंडन, कालौर्वी वैरी, लोकार्नो यांचा समावेश असणार आहे. लैंगिक असामानता, संस्कृती, घरगुती हिंसाचार, अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना हा सिनेमा पितृसत्तेला संबोधित करतो.

'नटखट' ही शॉर्ट फिल्म अनुकम्पा हर्ष आणि शान व्यास यांनी लिहिली आहे. या सिनेमाची निर्मिती विद्या बालनची असून ती यात मुख्य भूमिकेत देखील दिसून येणार आहे. विद्याची ही पहिलीच निर्मिती आहे.  

vidya balan produce natkhat premier today at global festival  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com