हॉटेलमध्ये गेल्यावर मुद्दाम दरवाजा उघडा ठेवला...

वृत्तसंस्था
Tuesday, 27 August 2019

एक दिग्दर्शक मला वारंवार हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवत होता. कॉफी शॉपमध्ये बोलून म्हटल्यावरही हॉटेलचाच आग्रह धरत होता.

चेन्नईः एक दिग्दर्शक मला वारंवार हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवत होता. कॉफी शॉपमध्ये बोलून म्हटल्यावरही हॉटेलचाच आग्रह धरत होता. हॉटेलमध्ये गेल्यानंतर मुद्दामहून मी दरवाजा उघडा ठेवला. पण, पाच मिनिटातच तो तिथून निघून गेला, असा अनुभव अभिनेत्री विद्या बालन हिने व्यक्त केला.

#MeToo चळवळीनंतर अनेक अभिनेत्रींनी चित्रपट मिळवण्यासाठी लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागल्याची कबुली दिली होती. 'कास्टिंग काऊच'चा प्रकार आजही सुरू आहे. 'परिणीती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री विद्या बालन हिने तिला आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितला.

विद्या बालन म्हणाली, 'आजही मला चांगले आठवते की मी, चेन्नईला एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी गेली होते. त्यावेळी तिथल्या एका दिग्दर्शकाने मला एका चित्रपटासाठी हॉटेलमध्ये भेटायची इच्छा व्यक्त केली. मात्र, कॉफी शॉपमध्ये बसून आपण बोलूया असे मी म्हणाले. मात्र, त्यांनी वारंवार मला हॉटेलच्या रुममध्ये जाऊन बोलूयात असाच आग्रह केला. अखेर, आम्ही माझ्या हॉटेलच्या रुममध्ये गेलो. मी, मुद्दामहून रुमचा दरवाजा उघडाच ठेवला. विशेष म्हणजे, पाच मिनिटांत ते तिथून निघून गेले.'

अभिनयादरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहे. मात्र, चाहत्यांना एक सल्ला नक्कीच देईल की, 'तुम्ही सगळ्यांना खूश करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसेच राहा.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidya Balan recounts scarring casting couch incident, says south director asked to go to her hotel room