विद्या बालन शिकवतेय 'ब्लाऊज पीस'पासून कसा बनवायचा मास्क? पहा व्हिडिओ

vidya
vidya

मुंबई- कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्याासाठी आता घराबाहेर पडताना मास्क वापरणं गरजेचं आहे..मात्र देशात सध्याअनेक ठिकाणी मास्कचा तुटवडा जाणवतोय..अशातंच सोशल मिडीयावर घरच्या घरी मास्क कसा बनवता येईल याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत..ओढणी, रुमाल यांसारख्या गोष्टींपासून ंमास्क बनवताना पाहिला असेल मात्र अभिनेत्री विद्या बालन तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आली आहे ज्यात ती घरच्या घरी मास्क कसा बनवावा हे सांगतेय.. या व्हिडिओमध्ये विद्या चक्क ब्लाऊज पीसपासून मास्क बनवताना दिसतेय..

विद्या बालनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे..तिने हा व्हिडिओ सगळ्यांसाठी बनवला आहे..या व्हिडिओमध्ये विद्या काही मिनिटातंच तिच्या ब्लाऊज पीसचा वापर करुन मास्क बनवतेय..हा मास्क कसा बनवायचा याची पूर्ण माहितीही ती देतेय..विद्याने हा मास्क बनवण्याचा एकदम साधा सरळ मार्ग सांगितला आहे..

विद्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहीलं आहे की, जसं की पंतप्रधान म्हणाले आहेत की घरगुती मास्कचा वापर करा , तुम्ही हा घरगुती मास्क साडीपासून किंवा स्कार्फपासून देखील बनवू शकता..यामुळे तुम्ही स्वतःची आणि तुमच्या कुटंबाची सुरक्षा करु शकता..विद्याने हा व्हिडिओ हॅशटॅग अपना देश अपना मास्क आणि हॅशटॅग होम मेड मास्कसोबत शेअर केला आहे..

विद्या बालन कोरोना व्हायरसच्या या संकटात तिच्या स्टाईलने जागरुकता निर्माण करतेय..तीने गरजुंच्या मदतीसाठी ज्याने त्याने जमेल तसं पुढे यावं याासाठी आवाहन देखील केलं आहे..काहीदिवसांपूर्वीच विद्याने तिच्या सोशल मिडीयावर एका महिला सफाई कर्मचारीला धन्यवाद देतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता..या व्हिडिओतून तिने मेडिकल क्षेत्रात काम करणा-या सगळ्या कर्मचा-यांचे आभार मानले आहेत..आता नव्याने विद्याने हा मास्कचा व्हिडिओ पोस्ट करत जनतेला तुमच्या मास्कमध्येच तुमची सुरक्षा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे..

vidya balan teaches fans how make face mask at home with the help of blouse piece  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com