'केवळ प्रसिद्धीसाठी बायोपिक करणं विद्याला मान्य नाही'

बॉलीवूडमध्ये (bollywood) आपल्या प्रभावी अभियनानं प्रेक्षकांच्या कौतूकास पात्र ठरलेली अभिनेत्री म्हणजे विद्या बालन (vidya balan).
 vidya balan
vidya balan FILE IMAGE

बॉलीवूडमध्ये (bollywood) आपल्या प्रभावी अभियनानं प्रेक्षकांच्या कौतूकास पात्र ठरलेली अभिनेत्री म्हणजे विद्या बालन (vidya balan). तिनं वेगवेगळ्या बायोपिकमध्ये काम केलं आहे. गेल्या वर्षी तिनं शकुंतला देवी (shakuntala devi) नावाच्या चित्रपटामध्ये एका गणिती प्राध्यापिकेची भूमिका केली होती. त्यानंतर शेरनीमध्ये विद्या व्हिसेंट (vidya vincent) या वनाधिकाऱ्याची भूमिका केली होती. आताही विद्याला अनेक बायोपिकच्या ऑफर आल्या आहेत. मात्र त्यापैकी कोणत्या भूमिका करायच्या किंवा स्वीकारायच्या याचा अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचंही तिनं सांगितलं आहे.

हिंदूस्थान टाईम्स दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत विद्यानं आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितलं आहे. विद्याच्या येणाऱ्या प्रत्येक चित्रपटांबद्दल तिच्या चाहत्यांना कमालीचं कुतूहल असतं. आपली भूमिका प्रभावी व्हावी यासाठी कमालीचे कष्ट घेताना दिसून आली आहे. प्रत्येक भूमिका मोठ्या मेहनतीनं साकारुन प्रेक्षकांना निखळ आनंद देणं हे आपलं काम असल्याची प्रतिक्रिया ती व्यक्त करते. बॉलीवूडमध्ये आतापर्यत वेगवेगळया सेलिब्रेटींनी अनेक बायोपिक साकारले आहेत. त्यात कित्येक अभिनेत्रींचाही समावेश आहे. त्यात एक अभिनेत्री म्हणून विद्या बालनचे बायोपिक नेहमीच प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरले आहे.

प्रत्येक बायोपिक करणं हे काही महत्वाचं नसतं. त्यात काही जीवनाविषयक मुल्यही असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तरी बायोपिकची निवड करताना अनेक गोष्टींचा विचार करते. आपण जो बायोपिक करणार आहोत त्यातून आपण प्रेक्षकांना काय सांगणार आहोत, ज्या व्यक्तीच्या आयुष्यावर तो बायोपिक आधारित आहे त्या व्यक्तिची जीवनाविषयक फिलोसॉफी काय होती हे पाहणंही महत्वाचं आहे. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी बायोपिक करणं हे माझ्या विचारात बसणारं नाही. असंही विद्यानं सांगितलं आहे.

 vidya balan
माझ्यात मंगोलियन चायनीज अन् फ्रेंच 'जीन्स' टायगर चर्चेत

2011 मध्ये विद्यानं डर्टी पिक्चरमधून सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. तर 2020 मध्ये शकुंतला देवीची भूमिका केली होती. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. पिंकव्हिलाशी बोलताना विद्यानं सांगितलं की, मला अनेक बायोपिकच्या ऑफर आल्या आहेत पण त्यापैकी थोड्याच बायोपिकमध्ये मी काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com