esakal | होय साखरपूडा झाला; बॉलिवूडमधील 'कमांडो'ची कबूली
sakal

बोलून बातमी शोधा

होय साखरपूडा झाला; बॉलिवूडमधील 'कमांडो'ची कबूली

होय साखरपूडा झाला; बॉलिवूडमधील 'कमांडो'ची कबूली

sakal_logo
By
नामदेव कुंभार

बॉलीवूडचा 'कमांडो' विद्युत जामवाल (vidyut jamwal) यानं फॅशेन डिजायनर नंदिता महतानी हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. विद्युत जामवाल याने इन्स्टाग्राम पोस्ट करत साखरपुडा केल्याची कबुली दिली आहे. मागील काही दिवसांपासून विद्युत जामवाल याच्या साखरपुड्याची चर्चा रंगली होती. विद्युत जामवाल याने इन्स्टाग्राम पोस्ट करत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. विद्युत जामवालने नंदितासोबतचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये विद्युत कमांडोच्या स्टाइलमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ताजमहलासमोर दोघे उभे आहेत. विद्युतने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘कमांडो स्टाइलमध्ये साखरपूडा केला. 1/09/2021.’ बॉलिवूड (bollywood)सिनेमांतून आपल्या अ‍ॅक्शन आणि अभिनयाने विद्युत जामवाल याने सर्वांनाच भूरळ पाडली.

नंदितानेही विद्युतसोबतचा एक फोटो पोस्ट करत साखरपुडा केल्याची कबुली दिली आहे. विद्युतसोबतचा फोटो पोस्ट करत नंदिताने लिहिलेय की, ‘Couldn’t keep him hanging any longer…said yes.’ नंदिता आणि विद्युत यांच्या या फोटोवर सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव होत आहे. नेटकरी त्यांना शुभेच्छा देत आहेत.

विद्युत आणि नंदिनी यांना ताजमहल येथे स्पॉट करण्यात आले. त्यावेळी काही फोटोग्राफर्सनं त्यांचे फोटो घेऊन सोशल मीडियावर व्हायरल केले होते. तेव्हा दोघांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली होती. त्यावेळी नेहा धुपियानं त्या दोघांना शुभेच्छा देताना सोशल मीडियावर लिहिलं आहे की, आतापर्यतची सर्वात गोड बातमी. जी मला आता समजली आहे. त्या दोघांनाही मी शुभेच्छा देते.

कोण आहे नंदिता महतानी?

विद्युत जामवाल आला क्लिन बोल्ड करणारी नंदिता बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. नंदिताने अनेक लोकप्रिय बॉलिवूड स्टारसोबत काम केल आहे. नंदिताचे नाव अभिनेता डिनो मोरियासोबतही जोडले गेले होते. मात्र व्यक्तीगत कारणामुळे त्यांचा ब्रेकअप झालं होता.

loading image
go to top