esakal | विद्युत जामवालनं गुपचूप उरकला साखरपूडा, फोटो व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत जामवालनं गुपचूप उरकला साखरपूडा, फोटो व्हायरल

विद्युत जामवालनं गुपचूप उरकला साखरपूडा, फोटो व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये जे काही टॉपचे स्टंटमॅन आहेत त्यात सर्वाधिक लोकप्रिय असणारा अभिनेता म्हणजे विद्युत जामवाल. तो त्याच्या अभिनयापेक्षा हटके अॅक्शनसाठी जास्त ओळखला जातो. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा विद्युत हा आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्यानं गुपचूप साखरपूडा उरकल्याचे दिसून आले आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कोरोनामुळे अनेक सेलिब्रेटींनी जास्त गाजावाजा न करता साखरपूडा आणि लग्न केल्याची उदाहरणं समोर आली आहेत. विद्युत जामवालच्या त्या फोटोंना त्याच्या चाहत्यांची मोठ्य़ा प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे.

विद्युतनं आपली गर्लफ्रेंड नंदिता महतानीसोबत गुपचूप साखरपूडा उरकल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आहे. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपियानं त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. विद्युत आणि त्याची होणारी पत्नी नंदिनी यांना ताजमहल येथे स्पॉट करण्यात आले. त्यावेळी काही फोटोग्राफर्सनं त्य़ांचे फोटो घेऊन ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचेही दिसून आले आहे. त्या फोटोमध्य़े नंदिताच्य़ा हातात असलेली अंगठी पाहून फॅन्सनं असा तर्क केला आहे की, त्या दोघांची एंगेजमेंट झाली आहे. त्यावर अभिनेत्री नेहा धुपियानं दिलेली प्रतिक्रिया म्हणजे त्यावर शिक्कामोर्तबही झालं आहे. असंही काही फॅन्सचं म्हणणं आहे.

नेहा धुपियानं त्या दोघांना शुभेच्छा देताना सोशल मीडियावर लिहिलं आहे की, आतापर्यतची सर्वात गोड बातमी. जी मला आता समजली आहे. त्या दोघांनाही मी शुभेच्छा देते. वास्तविक विद्युत जामवालनं आपल्या साखरपूडयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तो पहिल्यांदाच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिसून आला आहे. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षांवही केला आहे. काही महिन्यांपूर्वी विद्युतनं फॅशन डिझायनर नंदिता महतानीसोबत एक फोटो शेयर केला होता. त्यावेळी त्याच्या रिलेशनशिपविषयी चर्चा सुरु झाली होती. त्याच्यापूर्वी नंदितानं विद्युतच्या एका चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यावर विद्युतनं तिचे आभार मानले होते.

loading image
go to top