डिअर कॉम्रेडमधून विजय आणि रश्मिकाची जोडी पुन्हा एकत्र (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

दाक्षिणात्य आभिनेता विजय देवराकोंडाच्या डिअर कॉम्रेड या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. भारत कम्मा दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदना ही मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत असणार आहे. अर्जुन रेड्डीप्रमाणेच विजय या चित्रपटातही आक्रमक स्वभावाच्या विद्यार्थी नेत्याची भूमिका साकारताना दिसत आहे. तर, रश्मिका एका राज्यस्तरीय क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसत आहे.

हैद्राबाद : दाक्षिणात्य आभिनेता विजय देवराकोंडाच्या डिअर कॉम्रेड या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. भारत कम्मा दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदना ही मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत असणार आहे. अर्जुन रेड्डीप्रमाणेच विजय या चित्रपटातही आक्रमक स्वभावाच्या विद्यार्थी नेत्याची भूमिका साकारताना दिसत आहे. तर, रश्मिका एका राज्यस्तरीय क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसत आहे.

विजय आणि रश्मिकाने यापूर्वीही गीता गोविंदम या चित्रपटात सोबत काम केलेले आहे. या चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले होते. डिअर क्रॉमेड हा चित्रपट येत्या 26 जुलै रोजी चित्रपटगृहात येणार असून तेलगु, तमिळ कन्नड आणि मल्याळम अशा चार दाक्षिणात्य भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  आज (ता.10) या चित्रपटातील तेलगु भाषेतील ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात प्रेक्षकांना गीता गोविंदमनंतर पुन्हा एकदा विजय आणि रश्मिका यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. 

तीन मिनीटांच्या या ट्रेलरमध्ये विजय आणि रश्मिका यांच्या प्रेमात येणार अडथळे त्यांचे झालेले ब्रेकअप अशा गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.  पहिल्याच नजरेत विजय रश्मिकाच्या प्रेमात पडतो आणि चित्रपटाची कथानक पुढे सरकते. तेलंगणातील विद्यार्थी राजकारणावर या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. हा चित्रपट एका मल्याळम चित्रपटाचा कॉपी असल्याचे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Deverakonda is back as an angry young man in Bharat Kamma's film