Viju Mane: कोणाचं भाषण चांगलं हे सांगण्यापेक्षा.. विजू माने काय म्हणाले बघाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viju mane shared post on dussehra dasara melava speech cm eknath shinde and uddhav thackeray

Viju Mane: कोणाचं भाषण चांगलं हे सांगण्यापेक्षा.. विजू माने काय म्हणाले बघाच

दिग्दर्शक विजू माने हे सध्याच सर्वात चर्चेत असलेलं नाव. (viju mane) त्यांनी सध्या सर्वांना हसवण्याचा विडाच उचलला आहे. पांडू सिनेमातून त्यांनी ते सिद्ध केलंच शिवाय 'स्ट्रगलर साला'चा तिसरा सीजन देखील त्यांनी सुरू केला आहे. ते अनेकदा सामाजिक, राजकीय किंवा मनोरंजन विश्वातील घडामोडींवर व्यक्त होत असतात. बऱ्याचदा त्यांच्या काही पोस्ट या एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ असतात. पण यंदा त्यांनी एक वेगळीच पोस्ट केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसनेच्या दोन्ही दसरा मेळाव्यांना उद्देशून त्यांनी ही पोस्ट केली आहे.

(viju mane shared post on dussehra dasara melava speech cm eknath shinde and uddhav thackeray)

यंदाचा दसरा खूपच वेगळा होता. कारण दरवर्षी महाराष्ट्रात दसऱ्यासोबत गाजतो तो शिवसेनेचा दसरा मेळावा. पण यंदा या दसरा मेळाव्याला काही वेगळंच वळण लागलं. शिवसेनेतील दोन गट आणि त्यांच्यातील दासऱ्या मेळाव्याच्या जागेवरून रंगलेला वाद चांगलाच चर्चेत राहिला. शिवसेनेच्या दोन गटांचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे काल मुंबईत झाले. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचं भाषण केलं तर बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण झालं . दोन्ही भाषणात एकमेकांवर सडकून टीका करण्यात आली. ही भाषणं सोशल मिडियावरदेखील चर्चेचा विशेष ठरली. तुम्ही कुणाचं भाषण ऐकणार? कुणाचं भाषण चांगलं झालं? अशा अशा आशयाच्या बऱ्याच पोस्ट काल पडत होत्या. त्यावर विजू माने यांनी भाष्य केले आहे.

दिग्दर्शक विजू माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये काहीसे उपरोधिक भाष्य त्यांनी केले आहे. त्या पोस्टमध्ये एक माणूस निवांत झोपलेला दिसत आहे. त्यावर माने म्हणतात, 'स्वत: उठून नेतृत्व करण्याची माझी पात्रता नाही. त्यामुळे कुणाचं भाषण कसं झालं हे सांगण्यापेक्षा मला झेपेल ते मी करतो.' अशी पोस्ट विजू माने यांनी केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टरला एक कॅप्शनही दिले आहे.

'माझी झोप मला प्यारी...×$#त गेली दुनियादारी. राजकीय तज्ञ बनणं थांबवा. काही समस्या फार गंभीर असतात, त्या राजकारण्यांवर सोडून दिलेल्या बऱ्या..' असे त्यांनी म्हंटले आहे. त्यांची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.