विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांचं स्पष्टीकरण, अजय देवगणनं केलं होतं ट्विट | Vikram Gokhale Health Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram Gokhale

Vikram Gokhale: प्रकृतीबाबत कुटुंबीयांचं स्पष्टीकरण, अजय देवगणने केलं होतं ट्विट

Vikram Gokhale Health Update

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांनी अपडेट दिलीये. सध्या विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नये, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे. काही न्यूजपोर्टलवरील वृत्त आणि बॉलीवूडमधील अभिनेत्याच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर गोखलेंच्या प्रकृतीबाबत उलटसूलट चर्चा सुरू झाली होती.

चार दिवसांपूर्वी विक्रम गोखले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी दुपारी त्यांची प्रकृती खालावली. रात्री उशिरा काही न्यूजपोर्टलवर निधनाची बातमी प्रसिद्ध झाली होती. अभिनेता अजय देवगणनेही श्रद्धांजली वाहणारे ट्विट केल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सोशल मीडियावरील चर्चेनंतर अखेर कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिलंय. ‘विक्रम गोखलेंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कृपया अफवा पसरवू नये’, असं आवाहन कुटुंबीयांनी केलंय.

गोखले कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या विक्रम गोखले हे व्हेंटिलेटरवर आहेत. बुधवारी डॉक्टर प्रकृतीबाबत माहिती देतील. दरम्यान, गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला गोदावरी हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता.

टॅग्स :Vikram Gokhale