Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram Gokhale

Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली

Vikram Gokhale News: मराठी - हिंदी, नाटक, चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपासून गोखले यांच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याचे सांगण्यात आले असून आता त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मराठी नाटक, चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत म्हणून गोखले प्रसिद्ध आहेत. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोदावरी नावाच्या मराठी चित्रपटामध्ये देखील ते एका महत्वाच्या भूमिकेत दिसले.

हेही वाचा: Bollywood News: 'करिश्मा-अभिषेकचं लग्न शक्यच नव्हतं', काय होतं कारण?

गोखले यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थनाही केली आहे. रुग्णालयाकडून अधिकृतपणे अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नसून चाहत्यांना गोखले यांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या बातमीनं धक्का बसला आहे.

हेही वाचा: Bollywood Vs Tollywood; तिकीटाला पैसे नाहीत, चित्रपट चालतील कसे? अनुराग कश्यपचा भडका