विक्रांत मेसी लवकरच अडकणार लग्नबंधनात, कोण आहे ती अभिनेत्री ? |Vikrant Massey love life | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikrant Massey-Sheetal Thakur

विक्रांत मेसी लवकरच अडकणार लग्नबंधनात, कोण आहे ती अभिनेत्री ?

अभिनेता विक्रांत मेसी (Vikrant Massey)त्याची मंगेतर, अभिनेत्री शीतल ठाकूर (Sheetal Thakur) हिच्याशी या वर्षाच्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार आहे. सारा अली खानसोबतच्या (Sara Ali Khan) त्याच्या आगामी चित्रपट गॅसलाइटचे (Gaslight) शूट पूर्ण झाल्यावर दोघे लग्न करणार असल्याचे ऐकण्यात आले आहे.

लुटेरा (Lootera) आणि छपाक (Chapaak)यांसारख्या चित्रपटांचा आणि अनेक टीव्ही शो आणि वेब सीरिजचा (Web series) भाग असलेल्या विक्रांतने नोव्हेंबर 2019 मध्ये शीतलशी इंटीमेट एंगेजमेंट (Engagement)केली. ते दोघे 2015 पासून एकत्र आहेत.

बॉम्बे टाईम्सला (Bombay Times)दिलेल्या मुलाखतीत या अभिनेत्याने त्याच्या लग्नाबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता,''अगर लॉकडाउन नहीं होता तो मेरी शादी हो चुकी होती.'' ही एक गोष्ट आहे ज्याने मला काही महिने मागे ढकलले. 2020 मध्ये माझे शीतलशी लग्न होणार होते. अभिनेत्याने असेही म्हटले होते की त्याला 2021 मध्ये गाठ बांधण्याची आशा आहे. तथापि, 2021 मध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे लग्नाच्या योजनांना आणखी विलंब झाला.

विक्रांतने शीतल सोबत एका वेब शोमध्ये स्क्रीन स्पेस देखील शेअर केली होती. गेल्यावर्षी, दोघांनी सोशल मीडियावर आपल्या नवीन घराचे आणि घरातील पूजेचे फोटो पोस्ट केले होते, ज्यामुळे अनेकांना विश्वास बसला की तो विवाहित आहे. तथापि, त्याने ‘अजून लग्न केले नाही’असे कॅप्शन दिले. तर आता लवकरच त्याचे शूट पूर्ण होताच तो या वर्षी लग्न करेल. अभिनेत्याशी संपर्क साधता, त्याने प्रेसमध्ये जाईपर्यंत काहीच प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Vikrant Massey To Get Married Soon To The Love Of His

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top