Vinod Khanna Birth Anniversary : करिअरच्या टॉपवर असताना कोणत्या गोष्टीमुळे व्यथित झाले विनोद खन्ना? सहा वर्ष 'ते' सिक्रेट होतं कायम

बॉलीवूडमध्ये ज्यांच्या अभिनयाचा आणि व्यक्तिमत्वाचा मोठा दरारा होता त्या विनोद खन्ना यांची गोष्टच वेगळी होती.
Vinod Khanna Birth Anniversary
Vinod Khanna Birth Anniversaryesakal
Updated on

Vinod Khanna Birth Anniversary : बॉलीवूडमध्ये ज्यांच्या अभिनयाचा आणि व्यक्तिमत्वाचा मोठा दरारा होता त्या विनोद खन्ना यांची गोष्टच वेगळी होती. तीन दशकांहून अधिक काळ या अभिनेत्यानं आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा अभिनय हा अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

विनोद खन्ना यांची आज बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. त्यानिमित्तानं चाहत्यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कोणेएकेकाळी आपल्या भारदार व्यक्तिमत्वानं चाहत्यांना भारावून टाकणाऱ्या विनोदजींनी जी वाट निवडली होती त्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी निवडलेली वाट ही वादाचा विषय राहिली. त्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळे आरोपही झाले.

जे अभिनेते विनोदजींना ज्युनिअर होते त्यांनी विनोदजींची जागा घेतली. त्यात अनेक अभिनेत्यांचे नाव घेता येईल. पण विनोदजी त्यांच्या निर्णयावर शेवटपर्यत ठाम राहिले. त्यांना जीवनाचा खरा अर्थ काय हे जाणून घ्यायचे होते. म्हणून त्यांनी ओशोंच्या विचारांना फॉलो करण्याचा निर्णय घेतला. त्या वाटेनं ते पुढे जाऊ लागले. मात्र त्यांचा हा प्रवास चाहत्यांना आवडला नाही. कुटूंबियांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Vinod Khanna Birth Anniversary
Leo Trailer : नाद करा पण 'थलापती'चा कुठं? केजीएफचा रॉकी, जवानच्या विक्रम राठोडनं 'लिओ'चा ट्रेलर पाहून जोडले असते हात!

विनोदजींची आज ७७ वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. ६ ऑक्टोबर १९४६ रोजी त्यांचा जन्म पाकिस्तानमधील पेशावर येथे झाला. विनोद खन्ना यांचा जीवनप्रवास हा एखाद्या चित्रपटासारखाच होता. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. विनोदजींनी त्यांचे करिअर अगदी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अध्यात्माची वाट धरली. त्यामुळे कुटूंबीय देखील खूप हैराण झाले होते. ते ओशोच्या आश्रमात गेले होते. जेव्हा ते पुन्हा बॉलीवूडमध्ये आले तेव्हा त्यांचे करिअर संपुष्टात आले.

Vinod Khanna Birth Anniversary
Jawan Free Ticket Offer: लोभी जवान! कमाई वाढवण्यासाठी चाहत्यांना दिली भन्नाट ऑफर!

विनोद खन्ना यांचे जाणे त्यांच्या चाहत्यांसाठी खूपच मोठा धक्का होता. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडची मोठी हानी झाली. फार कमी लोकांना माहिती होतं की ते कर्करोगानं त्रस्त होते. त्यांनी सहा वर्षे त्या आजाराची माहिती कुणालाही दिली नाही. त्यांनी ती गोष्ट लपवून ठेवली. शेवटी त्यांना त्याचा त्रास झाला. शेवटी त्यांनी गुरुदासपूरच्या निवडणूकीच्यावेळी एका पत्रकार परिषदेमध्ये ती गोष्ट सांगितली होती.

Vinod Khanna Birth Anniversary
Kangana Ranaut : शेवटी कंगनाला कोर्टात यावचं लागलं!, जावेद अख्तर मानहानी प्रकरण

विनोदजींची कॅन्सरसोबतची लढाई यशस्वी झाली नाही. त्या आजारानं त्यांचा मृत्यू झाला. २७ एप्रिल २०१७ रोजी त्यांचे निधन झाले. केवळ बॉलीवूडच्या चाहत्यांमध्ये विनोदजी यांची लोकप्रियता नव्हती ते त्यांच्या मतदार संघामध्ये देखील विशेष लोकप्रिय होते. त्यांचा जनतेसोबत संवाद होता. १९९७ मध्ये ते बीजेपीमध्ये गेले. गुरुदासपूर मतदार संघातून ते खासदार झाले होते. तीन वेळा खासदार म्हणून त्यांनी काम पाहिले. २००२ मध्ये ते सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्रीय मंत्रीही होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com