Viraj Joshi : पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज यांना मानाचा 'सामापा' पुरस्कार जाहीर

अभिजात भारतीय संगीतातील विराज यांच्या अनुकरणीय कामाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा हा सन्मान करण्यात येत आहे.
Viraj Joshi Grand Son Of Pandit Bhimsen Joshi
Viraj Joshi Grand Son Of Pandit Bhimsen Joshi esakal

Viraj Joshi Grand Son Of Pandit Bhimsen Joshi : आपल्या बहारदार गायनानं चाहत्यांना, श्रोत्यांना भारावून टाकणारे स्वरभास्कर, पंडित भीमसेन जोशींची महती मोठी आहे. केवळ भारतच नाही तर जगभरामध्ये त्यांच्या गायनाचे चाहते आहेत. भीमसेनजींच्या गायनाचा वारसा त्यांचे नातू विराज पुढे समर्थपणे चालवत असल्याचे दिसून आले आहे.

किराणा घराण्याचे आश्वासक युवा गायक म्हणून विराज जोशी यांची ओळख आहे. त्यांना प्रतिष्ठेचा सामापा युवा रत्न सन्मान २०२३ जाहीर झाला आहे. दिल्लीस्थित प्रतिष्ठित सोपोरी अॅकॅडमी ऑफ म्युझिक अँड परफॉर्मिंग आर्ट्स संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या १९ व्या सामापा संगीत संमलनात या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. कार्यक्रम नवी दिल्ली येथील कामानी सभागृह या ठिकाणी ५ नोव्हेंबर रोजी सायं ६ वाजता पार पडणार आहे.

अभिजात भारतीय संगीतातील विराज यांच्या अनुकरणीय कामाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा हा सन्मान करण्यात येत आहे. विराज जोशी हे भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे नातू असून आपले वडील श्रीनिवास जोशी यांकडे ते सध्या संगीताचे शिक्षण घेत आहेत.

Viraj Joshi Grand Son Of Pandit Bhimsen Joshi
Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

सुप्रसिद्ध संतूरवादक पं भजन सोपोरी यांच्या प्रयत्नांतून सोपोरी अॅकॅडमी ऑफ म्युझिक अँड परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेची स्थापना झाली असून जम्मू आणि काश्मीर यांच्याशी उर्वरित देशाचे सौदार्ह्याचे संबंध संगीताच्या माध्यमातून कायम राहावेत, या उदात्त हेतून दरवर्षी सामापा संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते.

पारंपारिक भारतीय शास्त्रीय संगीताच्या शिक्षणासोबतच, सादरीकरण आणि संगीताचा प्रचार प्रसार व्हावा हा संस्थेचा मुख्य उद्देश असून तरुण आश्वासक कलाकारांना एक ताकदीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचाही संस्थेचा प्रयत्न असतो, यामुळेच यावर्षीचा सामापा युवा रत्न सन्मान किराणा घराण्याचे आश्वासक गायक विराज जोशी यांना आम्ही जाहीर करीत आहोत अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस आणि संतूर वादक, संगीतकार पं अभय रुस्तुम सोपोरी यांनी दिली आहे.

सामापा संमेलन हे दिल्लीतील एक प्रतिष्ठेचे संमेलन असून त्यांच्या वतीने जाहीर झालेला सामापा युवा रत्न पुरस्कार माझ्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे. कौतुकासोबतच जबाबदारीची जाणीव करून देणारा हा पुरस्कार मला जाहीर केल्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया विराज जोशी यांनी व्यक्त केली.

संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी कर्नाटक सरकारतर्फे २०२२ साली युवा प्रशस्ती राष्ट्रीय पुरस्काराने देखील विराज जोशी यांचा नुकताच सन्मान करण्यात आला असून हा पुरस्कार मिळविणारा विराज सर्वात कमी वयाचा मानकरी ठरला होता. याबरोबरच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विराज यांना प्रतिष्ठेची एम एस सुब्बुलक्ष्मी शिष्यवृत्ती देखील मिळाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com