विराटने शेअर केला हनिमूनचा हा किस्सा 

वृत्तसंस्था
Friday, 6 September 2019

विवाहबद्ध होताना विराट अनुष्का या दोघांनीही कमालीची गुप्तता पाळली होती. त्यानंतर ते दाेघे फिनलॅंड या ठिकाणी हनिमूनसाठी गेले हाेते. एका मुलाखती दरम्यान विराटने हनिमूनला गेल्यावर घडलेला रंजक किस्सा शेअर केला.

दिल्ली : भारतात जर कुठले कपल सर्वात जास्त चर्चेत असेल तर ते म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी दोघेही २०१७ साली विवाहबंधनात अडकले. विवाहबद्ध होताना दोघांनीही कमालीची गुप्तता पाळली होती. त्यानंतर ते दाेघे फिनलॅंड या ठिकाणी हनिमूनसाठी गेले हाेते. एका मुलाखती दरम्यान विराटने हनिमूनला गेल्यावर घडलेला रंजक किस्सा शेअर केला.

दरम्यान, हा किस्सा सध्या साेशल मिडियात चर्चेचा ठरला आहे. दरम्यान, विवाहबंधनात अडकल्यानंतर विरुष्काचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नाबद्दल कोणाला कानोकान खबर लागू नये याची पूर्ण खबरदारी अनुष्काने घेतल्याचं विराटने सांगितलं. या मुलाखतीत त्याने मजेशीर किस्से सांगितले.

दरम्यान, विराट-अनुष्का लग्नानंतर फिनलँड येथे हनिमूनला गेले होते. चाहत्यांच्या गर्दीपासून दूर, जिथे आपल्याला कोणीच ओळखू शकणार नाही अशा ठिकाणी त्यांना जायचं होतं. म्हणून त्यांनी ही जागा निवडली होती. तिथे घडलेला किस्सा सांगताना विराट म्हणाला, ”फिनलँडमधील त्यावेळी बर्फवृष्टी होत होती. त्या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे अजिबात प्रदूषण नाही आणि तिथली लोकसंख्यासुद्धा कमी आहे. हनिमूनच्या तिसऱ्या दिवशी आम्ही एका कॉफी शॉपमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी आम्हाला कोणीच ओळखू न शकल्याने आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला.

आमच्यासाठी ते एकप्रकारे स्वातंत्र्यच होतं. पण अचानक कॉफी शॉपच्या एका कोपऱ्यात मला शिख व्यक्ती दिसला. मी कॉफीच्या कपने माझा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. अनुष्काला जेव्हा मी ही गोष्ट सांगितली तेव्हा तिचीसुद्धा हीच अपेक्षा होती की, आता त्या व्यक्तीने आपल्याला ओळखू नये. मात्र त्या व्यक्तीने आम्हाला ओळखलं. आमच्याजवळ येऊन तो म्हणाला, ”तुम्हाला भेटून फार आनंद झाला आणि माझं आडनावसुद्धा कोहली आहे.” हे खरंच अनपेक्षित पण मजेशीर होतं. जगात अशी एखादी तरी जागा आहे का की जिथे मला कोणीच ओळखू शकणार नाही, असा प्रश्न मला पडला. विराटने लग्नाच्या दोन महिन्यांपूर्वी जवळच्या मित्रमंडळींना लग्नाची कल्पना दिली होती. अनुष्काच्या मर्जीनेच लग्नाचे सर्व नियोजन केल्याचे विराटने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: virat kohli shares an interesting incident during their honeymoon