सौंदर्या सोबत माझं नातं फार काळ टिकू शकलं नाही..  विशाल निकमचा ब्रेकअप.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vishal nikam break up with saundarya

सौंदर्या सोबत माझं नातं फार काळ टिकू शकल नाही..  विशाल निकमच ब्रेकअप..

'जोतिबा' या पौराणिक मालिकेतून घराघरात पोहोचलेला आणि 'बिग बॉस' (bigg boss)च्या माध्यमातून चर्चेत आलेला विशाल निकम (vishal nikam) महाराष्ट्राचा लाडका अभिनेता ठरला आहे. त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’ (big boss marathi) च्या तिसऱ्या पर्वाचे विजेतपद त्याने पटकावले. या पर्वात अनेकदा विशालने सौंदर्या हिचा उल्लेख केला होता. त्यामुळे विशालची ही सौंदर्या नेमकी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अनेकांनी काही अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जोडले होते. परंतु चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी आहे.

हेही वाचा: laal singh chaddha : 'या' खास ठिकाणी झाला 'कहाणी' गाण्याचा जन्म.. आमिर खान म्हणाला..

नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान विशालने सौंदर्याशी ब्रेकअप झाल्याचे सांगितलं आहे. विशाल निकम हा इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असतो. काही दिवसांपूर्वी विशालने सौंदर्याबद्दल एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना कळकळीची विनंतीही केली होती. ती एक सामान्य मुलगी असून, अभिनयसृष्टीशी तिचा काही एक संबंध नाही, मला थोडा वेळ द्या… असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते.

हेही वाचा: चित्रपट चालणं तर दूर, प्रदर्शित होतायत हीच मोठी गोष्ट.. हेमांगी कवीची खंत

यानंतर आता नुकतंच एका मुलाखतीत विशालने सौंदर्याशी ब्रेकअप झाल्याचे सांगितले आहे. “मी बिग बॉसच्या घरात ज्या सौंदर्याचा उल्लेख केला होता, आता मात्र माझा तिच्याशी काहीही संपर्क नाही. आमच्या दोघांचे नाते फार काळ टिकू शकलं नाही”, असे विशाल म्हणाला.

“सौंदर्याशी माझं ब्रेकअप झालं आहे. सौंदर्याशी असलेल्या रिलेशनशिपवरून मी खोटं बोलतोय असं आता अनेक लोकांना वाटत असेल. पण हे अगदी खरं आहे. सौंदर्या ही माझी गर्लफ्रेंड होती, पण आता मात्र मी सिंगल आहे. मी सध्या माझ्यावर कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. बिग बॉस मराठीनंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. मी जिथेही जायचो, तिथे मला लोक सौंदर्याबद्दल विचारायचे. म्हणूनच मी सर्व चाहत्यांना ब्रेकअपबद्दल सांगायचं ठरवले आहे. माझ्यासाठी हे फार कठीण आहे. लोक कदाचित माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि त्यांना मी खोटं बोलतोय, असं वाटेल. पण मी खोटं बोलत नाही. मूव्ह ऑन होणं खूप कठीण आहे पण मी सध्या प्रयत्न करतोय”, असे विशाल निकमने सांगितले.

Web Title: Vishal Nikam Breakup With Saundarya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top