esakal | तुमच्या घरातल्या कुत्र्या मांजरांच्या बातम्या दिल्या तेव्हा चाललं का; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri now against with Shah Rukh Khan Aamir Khan they File Suit Against media

बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे.  रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात काही बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे.

तुमच्या घरातल्या कुत्र्या मांजरांच्या बातम्या दिल्या तेव्हा चाललं का; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा सवाल

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडच्या कलाकारांनी काही वृत्तवाहिन्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. माध्यमांच्या विरोधात भूमिका घेतल्याने यावर संबंधित तक्रारदारांवर टीका केली आहे. यात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने ‘ तुमच्या घरातल्या कुत्र्या मांजरांच्या बातम्या दिल्या तेव्हा चाललं का असा खोचक सवाल बॉलीवूडच्या त्या तक्रारदारांना विचारला आहे.

बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे.  रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात काही बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे. चित्रपट उद्योगाविरुद्ध ‘बेजबाबदार, मानहानीकारक आणि अपमानास्पद’ प्रसारण करण्यापासून, तसेच या उद्योगातील व्यक्तींविरुद्ध ‘मीडिया ट्रायल्स’ घेण्यास रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ या वृत्तवाहिन्यांना प्रतिबंध करावा, अशी मागणी करणारी याचिका बॉलिवूडमधील आघाडीच्या निर्मात्यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली.

यासगळ्या प्रकरणावर विवेकने खरमरीत टीका केली आहे. तो म्हणतो, “जेव्हा तुमच्या घरातील कुत्री-मांजरं, त्यांचे कपडे, मेकअप, हॉलिडेज, तुमची मुलं यांच्या पेड बातम्या जेव्हा छापल्या जात होत्या. तेव्हा तुम्हाला खुप चांगलं वाटत होतं. या बातम्या वाचणारे प्रेक्षक आणि चाहते जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारु लागले तेव्हा मात्र तुम्हाला त्रास होऊ लागला. थेट कोर्टाचाच दरवाजा तुम्ही ठोठावला.” अशा आशयाचं ट्विट त्याने केले आहे. यापूर्वी अभिनेत्री कंगणानेही त्या तक्रारदार अभिनेत्य़ांवर तोफ डागली होती.  'त्यात आता कळलं का संपूर्ण जगासमोर इभ्रतीचे वाभाडे निघाल्यावर कसं वाटतं?' असा सवाल तिने याचिका दाखल करणा-यांना विचारला आहे.

राम गोपाल वर्मा यांनीही ‘बॉलिवूडकडून आलेली प्रतिक्रिया खूप उशिरा आणि खूप थंड अशा प्रकारची म्हणता येईल. चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेणं म्हणजे एका शाळेतल्या मुलाने शिक्षकाकडे जाऊन, ‘टिचर, टिचर, तो अर्णब मला शिवी देतोय’ असं तक्रार करण्यासारखं आहे,’ असं आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.