ऐश्वर्याच्या प्रेमाने संपवलं विवेक ओबेरॉयचं करियर.. काय आहे हा लव्हलोचा?

Happy Birthday Vivek Oberoi : एक काळ असा होता की विवेक ऐश्वर्या रायच्या प्रेमात वेडा झाला होता, पण मध्ये सलमान आडवा आला.
Vivek Oberoi birthday : vivek and aishwarya rai relation breaks  because of salman khan
Vivek Oberoi birthday : vivek and aishwarya rai relation breaks because of salman khan sakal

Vivek Oberoi Birthday : एकेकाळी बॉलीवुड गाजवलेल्या आणि नंतर पूर्णतः त्यातून बाहेर पडलेल्या अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) च्या करियरपेक्षा त्याचे वैयक्तिक आयुष्यच अधिक चर्चेत राहिले आहे. आज विवेकचा ४६ वा वाढदिवस. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या एका मोठ्या घटनेबद्दल. अर्थात त्याच्या प्रेमाबद्दल. अस प्रेम ज्याने विवेकच्या करियरला मोठा धक्का बसला.

विवेकचा जन्म 3 सप्टेंबर 1976 रोजी हैदराबाद येथे झाला. विवेकचे वडील सुरेश ओबेरॉय हे देखील बॉलिवूडमधील एक दिग्गज अभिनेते आहेत. विवेक ओबेरॉयने 2002 मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ ता चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याlला 'फिल्मफेअर अवॉर्ड'ही मिळाला होता. विवेकच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक संकटे पाहिली. अगदी त्याचे मनोरंजन विश्वातील करियरही पणाला लागले. (Vivek Oberoi birthday : vivek and aishwarya rai relation breaks because of salman khan)

विवेकचे बॉलिवूडमधील पदार्पण खूप यशस्वी ठरले होते. मात्र, त्याचे प्रेम आडवे आले. त्याच्या अभिनयापेक्षाही त्याचे ऐश्वर्या रायसोबत असलेले प्रेम अधिक चर्चेत राहिले. पण हे सगळं सलमान खानच्या नजरेत आले आणि विवेकच्या करियरला गालबोट लागले. झाले असे की, ऐश्वर्या आणि सलमानची भेट 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. 1999-2001 पर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले. पण, नंतर त्यांचे नाते तुटले. दरम्यान, विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) आणि ऐश्वर्या राय यांच्यात जवळीक वाढली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान विवेकने सलमान खान बाबत एक अशी चूक केली ज्यामुळे त्याला मोठा पश्चाताप झाला.

एक पत्रकार परिषदेत विवेक म्हणाला, सलमानकडून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. त्याने मला तब्बल ४२ वेळा फोन केला आहे. ही बाब सलमानच्या जिव्हारी लागली आणि या घटनेनंतर विवेकचं आयुष्यच बदलून गेलं. जिच्यासाठी विवेकने एवढं मोठं पाऊल उचललं, ती ऐश्वर्याही त्याची साथ सोडून गेली आणि खऱ्या अर्थाने त्याच्या करियरला उतरती काळा लागली. त्यावेळी सलमानचे मनोरंजन विश्वात मोठे प्रस्थ असल्याने विवेकचे अनेक चित्रपट त्याने काढून घेतले असे बोलले जाते. त्यामुळे विवेकला आपल्याच चिकीमुळे मनोरंजन विश्वाला रामराम करावा लागला. यानंतर त्याने 2010 मध्ये कर्नाटकचे माजी मंत्री दिवंगत जीवराज अल्वा यांची कन्या प्रियांका अल्वा हिच्याशी विवाह केला.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com