विवेक नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

2019 मध्ये दोन बड्या राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहेत. यामध्ये "ठाकरे' आणि "द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटांचा समावेश आहे. अशातच आता आणखी एका राजकीय नेत्याच्या बायोपिकची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार असल्याचं बोललं जात आहे आणि अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा आहे. या बायोपिकमध्ये विवेक मोदी यांच्या तरुणपणीची भूमिका साकारणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विवेकने या चित्रपटासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. सध्या तरी या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे. तसेच उमंग कुमार या बायोपिक चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. लवकरच या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणादेखील करण्यात येईल. एकूणच काय, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचादेखील बायोपिक येणार म्हणजे पुढील वर्ष राजकीय नेत्यांच्या बायोपिकचं असणार हे निश्‍चित. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vivek Oberoi plays Narendra Modi s role?