मोदींवरील बायोपिकचे पोस्टर रिलीज

वृत्तसंस्था
सोमवार, 7 जानेवारी 2019

बॉलिवूडमध्ये या वर्षांत तीन मोठ्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक प्रदर्शित होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर देखील जीवनपट येत आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा प्रमुख भूमिकेत असणार आहे.

मुंबई- बॉलिवूडमध्ये या वर्षांत तीन मोठ्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक प्रदर्शित होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर देखील जीवनपट येत आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा प्रमुख भूमिकेत असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहे. आज (ता.07) त्याने आपल्या ट्विट करत पोस्टरचे फोटोही टाकले आहेत. या बायोपिकमध्ये विवेक मोदी यांच्या तरुणपणीची भूमिका साकारणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. २३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. उमंग कुमार या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या महिन्यातच ‘पीएम नरेंद्र मोदी’ च्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या चित्रपटात विवेकसोबतच ज्येष्ठ अभिनेते परेश रावलही मुख्य भूमिकेत आहेत.

दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या पहिल्या वहिल्या पोस्टरमध्ये विवेक ओळखूही येत नाही. विवेकचा लूक हा मोदींच्या जवळपास जाणारा आहे असं म्हणत अनेकांनी कौतुक केलं आहे. #AkhandBharat #PMNarendraModi असे म्हणत विवेकने यासंबधी ट्विट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vivek Oberoi To Star In Narendra Modi Biopic Titled Pm Narendra Modi