Vivian Dsena:'मधुबाला' मधल्या ऋषभनं केलं गुपचूप लग्न, दुसरी पत्नी थेट इजिप्तची.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivian Dsena

Vivian Dsena:'मधुबाला' मधल्या ऋषभनं केलं गुपचूप लग्न, दुसरी पत्नी थेट इजिप्तची..

अभिनेता विवियन डिसेना हे टीव्हीवरील प्रसिद्ध नाव आहे. अभिनेते अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. विवियनचा दोन वर्षांपूर्वी पत्नी वाहबीज डोरबाजीपासून घटस्फोट झाला होता.

त्यानंतर इजिप्तमध्ये राहणाऱ्या नौरान अलीसोबत त्याचं अफेअर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याचबरोबर बातम्या येत आहेत की, अभिनेत्याने नौरनसोबत गुपचूप लग्न केले आहे. तथापि, अभिनेत्याने आतापर्यंत त्यांचे नाते पूर्णपणे गुपित ठेवले आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, विवियन इजिप्त येथे राहणाऱ्या पत्रकार नौरान एलीला अनेक दिवसांपासून डेट करत होता. विवियनच्या जवळच्या सुत्राने याचा खुलासा केला की 'विवियन डेट करण्यावर इतका विश्वास ठेवत नाही. लग्नाशिवाय तो कुणासोबत राहू शकत नाही, म्हणून त्याने नौरानशी लग्न केले.

दोघे मुंबईतील लोखंडवाला येथील एका अपार्टमेंटमध्ये गेल्या एक वर्षाहून अधिक काळ एकत्र राहत होते. त्याचवेळी, विवियन आणि नौरन यांनी लग्नगाठ बांधली असल्याचंही एका सूत्राने सांगितले आहे. त्यांचे लग्न अतिशय खाजगी ठेवण्यात आले होते.

विवियनची पत्नी नौरान अली ही इजिप्तची आहे. ती पत्रकार आहे. मात्र, तिला भारत आवडतो. लग्नानंतर नौरानने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ती पतीसोबत मुंबईत शिफ्ट झाली आहे.

विवियन डिसेनाची नूरन अलीशी पहिली भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. नूरनला खूप दिवसांपासून विवियनची मुलाखत घ्यायची होती. मात्र, तो वारंवार पुढे ढकलत होता. शेवटी एके दिवशी त्याने नूरनची मुलाखत घेण्यासाठी हो म्हटलं आणि इथून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता त्यांनी लग्न केल्याची चर्चा आहे.

टॅग्स :viraltv actortv