सलमानसोबतच्या नात्यावर कॅटरिनाने केला मोठा खुलासा...

वृत्तसंस्था
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कॅटरिना सलमानसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणानं बोलली. सलमान आणि तिच्यामध्ये नेमकं काय नातं आहे हे तिनं स्पष्ट केलं. तिच्यात आणि सलमानमध्ये मैत्रीव्यतिरिक्त आणखी काहीच नव्हतं असं तिनं यावेळी स्पष्ट केले आहे.

मुंबई : सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यात अफेअर सुरु असल्याच्या चर्चा गेल्या 16 वर्षापासून ऐकायला मिळतात. परंतु, यावर कॅटरिना कैफने मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कॅटरिना सलमानसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणानं बोलली. सलमान आणि तिच्यामध्ये नेमकं काय नातं आहे हे तिनं स्पष्ट केलं. तिच्यात आणि सलमानमध्ये मैत्रीव्यतिरिक्त आणखी काहीच नव्हतं असं तिनं यावेळी स्पष्ट केले आहे.

रणबीर कपूरसोबत सूत जुळल्यानंतर कतरिना सलमानपासून दूर झाली होती. मात्र, जवळापास 5 वर्षांनी या दोघांनी जेव्हा 'टायगर जिंदा है'मध्ये काम केलं त्यावेळी अनेकांना त्यांच्यातील नातं अद्याप कायम आहे असं वाटलं. मात्र, कतरिना आणि सलमान कोणीच या नात्याविषयी कधीच उघडपणे बोलले नाहीत.

माझ्यात आणि सलमानमध्ये मागच्या 16 वर्षांपासून मैत्रीपेक्षा काहीच नाही. आम्ही दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत अणि सलमान एक चांगली व्यक्ती आहे. मला जेव्हाही त्याची गरज असते त्यावेळी तो नेहमीच मला पाठिंबा देतो. सलमान अशी व्यक्ती आहे जी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये सतत नसेलही मात्र जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते त्यावेळी तो तुम्हाला नक्कीच मदत करतो, असेही कॅटरिनाने स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watch: Katrina Kaif talks about her equation with Salman Khan and Bollywood