esakal | साऊथ सुपरस्टार विजयच्या 'मास्टर' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, पाहा पहिली झलक

बोलून बातमी शोधा

master film}

सिनेमात विजयचा जबरदस्त मास्टर लूक दिसून येतोय. विजयला पाहुन चाहते त्याच्या पुन्हा एकदा प्रेमात पडतील.

साऊथ सुपरस्टार विजयच्या 'मास्टर' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, पाहा पहिली झलक
sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- साऊथचे दोन सुपरस्टार विजय आणि विजय सेथुपती यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'मास्टर'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा ट्रेलर रिलीज झाल्यावर लगेचच चाहत्यांमध्ये ट्रेंड होतोय. हा तमिळ सिनेमा असून तेलुगु आणि हिंदी भाषेतही रिलीज केला जाणार आहे. सिनेमात विजयचा जबरदस्त मास्टर लूक दिसून येतोय. विजयला पाहुन चाहते त्याच्या पुन्हा एकदा प्रेमात पडतील. हा सिनेमा १३ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.  

हे ही वाचा: उर्वशी रौतेलाने पार्टीमध्ये परिधान केला तब्बल ३२ लाखांचा लेहेंगा, तयार करण्यासाठी लागले एवढे दिवस  

सिनेमाचा ट्रेलर जबरदस्त आहे. यामध्ये विजयचा दमदार अभिनय पाहून कळतंय की सिनेमाची कहाणी एका कॉलेजच्या शिक्षकावर आधारित आहे आणि या भूमिकेत विजय दिसून येतोय. हा कोणी साधासुधा शिक्षक नाहीये कारण संपूर्ण ट्रेलरमध्ये तो कुठेच तुम्हाला शिकवाताना दिसत नाहीये तर मारामारी करताना दिसतोय. असं वाटतंय की हा विद्यार्थांचा शिक्षक नसून वेगळ्याच गोष्टीत मास्टर आहे.

या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर पाहुन एक मात्र नक्की सिनेमा बॉक्स ऑफीसवर धुमाकुळ घालणार आहे. पुरेपुर ऍक्शन, आमने सामने असलेले विजय आणि विजय सेथुपती, दोघांचाही दमदार अभिनय, सिनेमाची कथा आणि जबरदस्त ड्रामा यामुळे या सिनेमा हिटच्या रांगेतंच आहे. आता नेमकी कहाणी कशी असेल हे मात्र सिनेमा रिलीज झाल्यावर कळेल. या शिक्षकासोबत असं काय घडतं की तो त्यांना शिकवण्याऐवजी त्यांची रक्षा करतोय. नेहमीप्रमाणेच विजयच्या या कहाणीमध्येही प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ट्विस्ट असेल यात शंका नाही.    

watch this trailer of south superstar vijay film vijay the master