OTT Releases: थिएटरमध्ये नाही गेलं तरी चालेल! नोव्हेंबरमध्ये मोठी ट्रीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OTT Releases

OTT Releases: थिएटरमध्ये नाही गेलं तरी चालेल! नोव्हेंबरमध्ये मोठी ट्रीट

OTT November Releases- ओटीटीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. याचा मोठा फटका थिएटरचालकांना बसला आहे. एखादा चित्रपट आवर्जुन थिटएरला पाहिलाच पाहिजे अशा निमित्तानं प्रेक्षक थिएटरमध्ये जातात. अन्यथा संबंधित चित्रपट दोन आठवड्यांमध्ये ओटीटीवर येतोच. हे त्यांना माहिती झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असणार आहे.

येत्या महिन्यात वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोनापासून ओटीटीनं प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. थिएटरपेक्षा ओटीटीवर चित्रपट पाहण्यास अधिक प्राधान्य दिले जात आहे. अर्थात याला अपवाद काही बॉलीवूड, टॉलीवूडच्या चित्रपटांचा असल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबरमध्ये इंग्रजी, हिंदी भाषेतील नव्या सीरिज प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहेत.

'ब्लॉकबस्टर'

तीन नोव्हेंबरला ही मालिका प्रदर्शित होणार असून ती एक फुल्ल टू कॉमेडी मालिका आहे. एका मॅनेजरची गोष्ट या मालिकेतून दाखवण्यात आली आहे. नेटफ्लिक्सवर ही मालिका रिलिज होणार असून प्रेक्षक त्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

'द ड्रॅगन प्रिंन्स: मिस्ट्री ऑफ आरावोस'

ही दोन राजकुमारांची कथा आहे. ती तीन भागांमध्ये विभागलेली आहे. सोशल मीडियावर या मालिकेची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. त्याचे पहिले तीन भाग प्रेक्षकांना कमालीचे आवडले आहेत. ते मून, स्काय आणि सन असे होते. आता चौथा सीझन अर्थ असून तो तीन नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

'द फॅब्युलस'

ही एक कोरियन वेबसीरिज आहे. ज्यात मैत्री, संघर्ष आणि रोमान्स दाखवण्यात आला आहे. कोरिअन मुव्ही आणि सीरिजचा मोठा चाहतावर्ग आहे. यामध्ये आय एम नॉट अ रोबोट फेम चाई सू बिन हे दिसणार आहे. ही मालिका 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: Janhvi Kapoor: जान्हवीचा खोल गळ्याचा ब्लाऊज

'ब्रीद: इन टू द शॅडोज 2'

सोशल मीडियावर आता अभिषेक बच्चन चांगलाच लोकप्रिय झाला आहे. त्याच्या दसवी नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. अभिषेकच्या ब्रीद इन टू शॅडोजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅमेझॉन प्राईमवर हा चित्रपट 9 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: Janhvi Kapoor : जान्हवीचा लाल ड्रेसमधला किलर लूक बघितला का?