Taapsee Pannu: “घाबरली की काय?” तापसी का होतेय ट्रोल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taapsee Pannu

Taapsee Pannu: “घाबरली की काय?” तापसी का होतेय ट्रोल...

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही नेहमीच चर्चेत असते. ते तिच्या चित्रपटांमूळे नाही तर तिच्या वागण्यामूळं. ती अनेकदा पापराझींवर भडकत असते.महिन्यांत अनेक वेळा पापाराझींना फटकारताना दिसली आहे. आता तिची चर्चा रंगली आहे तिच्या एका पोस्टमूळे. ती 'ब्लर' नावाचा नवीन चित्रपट घेऊन येत आहे. याचंच मोशन पोस्टर तिने सोशल मिडियावर पोस्ट केलयं.

तिचा हा चित्रपट थिएटरवर प्रदर्शित होणार नसून OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे, त्याचे मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आलयं. या चित्रपटातून तापसी दिग्दर्शनात पदार्पण करणार असल्यानं खरी चर्चा रंगली आहे. आता नेटकऱ्यांना प्रश्न पडलायं की तापसी घाबरली तर नाही ना, ज्यामुळे ती हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याऐवजी OTT वर प्रदर्शित करतेय.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

तापसी पन्नूचा ब्लर चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 9 डिसेंबर 2022 रोजी ZEE5 वर प्रीमियर होईल. यामध्ये तापसीसोबत गुलशन देवय्यानेही महत्त्वाची भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा: Big Boss 16: ‘या’ स्पर्धकांवर या आठवड्यात एलिमिनेशनची टांगती तलवार...

खरं तर तिने 'पिंक', 'नाम शबाना', 'मुल्क', 'थप्पड' आणि 'हसीन दिलरुबा' यासह अनेक चित्रपटांमध्ये चमकदार अभिनय केला आहे, परंतु तिचे मागील अनेक चित्रपट सातत्याने फ्लॉप होत आहे. त्यातच 'रश्मी रॉकेट', 'लूप लपेटा', 'दोबारा' हे चित्रपट चांगलेच आपटले. अशा परिस्थितीत तिला आता धोका पत्करायचा नसल्याचं बोललं जात आहे. तसचं तिचा हा पहिलाच दिग्दर्शित चित्रपट आहे. त्यामुळे आता तिने 'ब्लर' हा चित्रपट फक्त ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला.