esakal | रसिका दुग्गलच्या 'आउट ऑफ लव 2' ट्रेलर व्हायरल

बोलून बातमी शोधा

web serise out of love starring purab kohli and rasika dugal
रसिका दुग्गलच्या 'आउट ऑफ लव 2' ट्रेलर व्हायरल
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - डॉ. मीरानं तीन वर्षांपूर्वी आपला पती आकर्षनं दिलेल्या धोक्याचा खुलासा केला होता. त्यानंतर त्यांचे वैवाहिक आयुष्य पुन्हा ट्रॅकवर आले होते. मात्र जेव्हा तो पुन्हा सुड घेण्याच्या गोष्टी करु लागतो त्यावेळी चित्र बदललेले असते. मीराच्या आयुष्यात मोठं वादळ येऊन गेलं आहे. ज्याची किंमत तिला आता मोजावी लागणार आहे. वास्तविक मीराला अद्याप कुठलीच कल्पना नाही. प्रेक्षकांची जबरदस्त पसंती मिळालेली वेब मालिका म्हणून आऊट ऑफ लव्हचा उल्लेख करावा लागेल. आता या मालिकेचा दुसरा सीझन प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

अभिनेता पुरब कोहली आणि रसिका दुग्गल यांचा जबरदस्त अभिनय असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या कौतूकाचा विषय ठरली होती. आकर्षच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंद केले होते. सुडाची आग म्हणूनही या मालिकेकडे पाहिले गेले आहे. त्यामुळे त्याच्या दुस-या भागात काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आऊट ऑफ लवचा दुसरा सीजन हा 30 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेच्या दुस-या सीझनची चर्चा होती. आता ती लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

कुनूरच्या वेगवेगळ्या ठिकाणी या मालिकेचे शुटिंग करण्यात आले आहे. मालिकेची निर्मिती समीर गोगटे आणि बीबीसी स्टूडियोन केली आहे. ओनी सेन यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. मीनाक्षी चौधरी, संघमित्रा हितेषी, हर्ष छाया, एकावली खन्ना, सुहास आहुजा, कबीर आणि इशा चोप्रा सारखे कलाकार मालिकेत आहेत.