esakal | 'बंगालची वाघीण लवकरच बरी होईल' 
sakal

बोलून बातमी शोधा

west Bengal assembly election 2021 Mamata Banerjee injured actress shivsena leader Urmila matondkar tweet

जी गोष्ट तोडू शकत नाही ती तुम्हाला आणखी मजबूत बनवते.

'बंगालची वाघीण लवकरच बरी होईल' 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

 मुंबई - सध्या पश्चिम बंगालमधील निवडणूकांची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. नेत्यांच्या रॅली सुरु आहेत. अशावेळी आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडताना दिसत आहे. दरम्यान एक धक्कादायक घटना घडली होती. त्यामुळे सर्वांना भीती वाटून गेली. ती म्हणजे 10 मार्च रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची जोरदार चर्चा झाली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. ज्यावेळी ममता या नंदीग्रामध्ये प्रचारात व्यस्त होत्या त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला असे सांगण्यात आले आहे.

बुधवारी नंदीग्राम येथून निवडणूक लढवणा-या ममता यांच्यावर हल्ला झाल्यानं  मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यावर झालेला हल्ला त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. कार्यकर्त्यांनी निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमागे कुणाचा हात आहे त्याचा शोध सुरु आहे. त्यावर ममता यांना सपोर्ट करण्यासाठी अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ममता यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. त्याचे झाले असे की, ममता या बुधवारी नंदीग्राम येथे आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर एका मंदिरात निघाल्या होत्या. ममता यांनी असे म्हटले आहे की, आपल्यावर चार ते पाच लोकांनी जाणीवपूर्वक धक्का दिला. त्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे. यामागे कुणाचा हात असावा अशी शंका ममता यांनी व्यक्त केली आहे.

ममता यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रसिध्द अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी त्या घटनेचा निषेध केला आहे. तसेच ममता यांनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे. आपल्या व्टिटसोबत उर्मिला यांनी एक फोटोही शेअर केला आहे. ज्यात ममता जखमी झाल्या असून त्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे.

उर्मिला यांनी व्टिटमध्ये लिहिले आहे की, जी गोष्ट तुम्हाला तोडू शकत नाही ती तुम्हाला आणखी खंबीर बनवते. आणि आपल्याला एक गोष्ट कळून येते की, या प्रकरणात अशा प्रकरणाची ताकद पाहिली असावी. बंगालची वाघीण लवकरात लवकर बरी होईल.अशी मी प्रार्थना करते. 


 
 

loading image