esakal | लॉकडाऊन दरम्यान अक्षय कुमार सांगतोय 'सुपरस्टार' बनण्याचा फॉर्म्युला
sakal

बोलून बातमी शोधा

akshay

बॉलीवूड सेलिब्रिटींनी स्वतःला घरात क्वारंटाईन करुन घेतलं आहे..आणि हे सेलिब्रिटी या ना त्या प्रकारे लोकांना घरात राहण्याचं आवाहन करताना दिसत आहेत..लॉकडाऊन दरम्यान बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारने सुपरस्टार होण्याचा एक फॉर्म्युला सांगितला आहे..

लॉकडाऊन दरम्यान अक्षय कुमार सांगतोय 'सुपरस्टार' बनण्याचा फॉर्म्युला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे जगभरात हजारो लोक मरण पावत आहेत..भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ९०६ वर जाऊन पोहोचली आहे..यातील आत्तापर्यंत १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे..त्यामुळे कोरोनाबाधितांची ही साखळी थांबवण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे..सगळेजण घरात राहुन लॉकडाऊन पाळत आहे...बॉलीवूड सेलिब्रिटींनी देखील स्वतःला घरात क्वारंटाईन करुन घेतलं आहे..आणि हे सेलिब्रिटी या ना त्या प्रकारे लोकांना घरात राहण्याचं आवाहन करताना दिसत आहेत..

हे ही वाचा- टायगर श्रॉफची बहिण 'हे' व्हिडिओ शेअर केल्याने झाली ट्रोल

याच लॉकडाऊन दरम्यान बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारने सुपरस्टार होण्याचा एक फॉर्म्युला सांगितला आहे..अक्षय सांगतोय की, कोरोना व्हायरसची ही साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देशात केल्या गेलेल्या लॉकडाऊनमध्ये जो स्वतःच्या घरीच राहिल तोच सुपरस्टार असेल..अक्षयने व्यापार विशेतज्ज्ञ जोगिंदर टुटेजाच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत त्याचं हे मत मांडलं आहे..

खरतर जोगिंदर यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला होता..त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ही गोष्ट सांगितली की, 'कशा प्रकारे टायगर श्रॉफ त्याच्या 'रँबो', 'हिरोपंती २' आणि 'बागी ४' सारख्या आगामी सिनेमांमध्ये सुपरस्टार बनण्यासाठी सज्ज आहे..' यावर अक्षयने कमेंट करत म्हटलंय, 'जोगिंदर तुमच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे की टायगर श्रॉफ येणा-या काळात धमाल उडवण्यासाठी सज्ज आहे मात्र सध्याच्या काळात तोच व्यक्ती सुपरस्टार असेल जो स्वतःच्या आणि त्याच्या कुटूंबाच्या सुरक्षिततेसाठी  या लॉकडाऊनमध्ये घरात बसेल. मी प्रत्येकाला सुपरस्टार बनण्यासाठी आवाहन करत आहे.'

अक्षय सतत सोशल मिडीयावर २१ दिवसांच्या या लॉकडाऊन दरम्यान देशातील नागरिकांना घरात राहून सरकारला मदत करण्यासाठी आवाहन करत आहे..जेणेकरुन कोरोना व्हायरला मुळापासून उखडून टाकून ही लढाई आपण जिंकू शकू.. 

what will akshay kumar do during lockdown learn the whole thing