Oscar: ऑस्करमध्ये ए आर रहमानचं भारतीय गाणं वाजलं आणि.. वाचा त्या खास गाण्याची गोष्ट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

when A R Rahman's jai ho song play in the academy awards oscars 2020

Bollywood and Oscar: ऑस्करमध्ये ए आर रहमानचं भारतीय गाणं वाजलं आणि.. वाचा त्या खास गाण्याची गोष्ट..

Bollywood and Oscar: चित्रपट जगतातला सर्वोच्च मानला जाणारा 'द अकादमी'चा ऑस्कर पुरस्कार सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ऑस्कर 2023 ची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत, यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात भारतीय चित्रपटांनीही हजेरी लावली असून यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटांची सरशी दिसत आहे. नुकतेच 'आरआरआर'चित्रपटातील 'नातू नातू' गाण्याला ऑस्करचे नामांकन मिळाले. पण या आधीही एका भारतीय संगीतकाराने आणि त्यांच्या गाण्याने ऑस्कर गाजवले आहे. आज पाहूया 'त्या' गाण्याची ही गोष्ट..

(when A R Rahman's jai ho song play in the academy awards oscars 2020 )

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिल बिग बॉसच्या घरात.. केलं मराठीत प्रपोज..

ही गोष्ट आहे 2008 ची. वर्षी प्रदर्शित झालेल्या भारतीय कथेवर आधारित 'स्लम डॉग मिलिनीयर' या ब्रिटिश सिनेमाने सर्वांनाच वेड लावले. हा चित्रपट ब्रिटिश असला तरी कथा भारतातील एका झोपडपट्टीवर आधारलेली असल्याने त्यातील कलाकार, संगीतकार ही भारतीय होते. या चित्रपटातील कथेचं जितकं कौतुक झालं तिटकच कौतुक संगीताचं झालं, आणि तो संगीतकार होता ए. आर. रहमान.

हेही वाचा: Marathi Serials: मराठी मालिकांमध्ये दिसणार रितेश - जेनिलिया, या दिवशी..

या चित्रपटाला २००९ साली ऑस्कर पुरस्कार मिळाला. यामध्ये सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून ए.आर. रहमान यांना गौरविण्यात आले. ज्या गाण्यासाठी त्यांना ऑस्कर मिळाला ते गाणे होते 'जय हो..' हे गाणे जेव्हा ऑस्कर मध्ये वाजले ते भारतीयांची मान उंचावली होती. जगभरातून रहमान यांचे कौतुक झाले.

त्यांनंतर 2020 मध्ये झालेल्या ९२व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही मागील दहा वर्षातील ऑस्कर पुरस्कार विजेतील सर्वोत्कृष्ट गाणी वाजवण्याचा निर्णय अकादमीने घेतला. त्यानुसार पुन्हा एकदा 'जय हो' हे गाणं वाजलं आणि भारताची शान वाढली. तेव्हाही या गाण्याची प्रचंड चर्चा झाली होती. आजही ही गाणं प्रत्येक भारतीयाला प्रिय आहे.