
Satish Kaushik: चक्क गरोदर अभिनेत्रीला सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी.. हा किस्सा वाचाच..
Satish Kaushik death: बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी पहाटे वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले. सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. कारण सतत हसणारे आणि हसवणारे सतीश कौशिक यांची अचानक एक्झिट सगळ्यांच्याच जिव्हारी लागली आहे.
सतीश कौशिक आणि अभिनयासोबत दिग्दर्शन आणि निर्मितीही केली. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटात अभिनय तर 20 हून अधिक चित्रपट दिग्दर्शित केले. बॉलीवुडमध्ये त्यांची दोस्ती यारी मोठी आहे. त्यांच्या आनंदी आणि गोड स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार प्रचंड मोठा आहे.
ते आपल्या मित्रांसाठी काहीही करू शकतात, असे म्हंटले जायचे आणि ते अगदी खरं आहे. एकदा तर त्यांनी आपल्या लग्नाआधीच गरोदर राहिलेल्या मैत्रिणीला नैराश्या बाहेर काढण्यासाठी चक्क लग्नाची मागणी घातली होती.
ती मैत्रीण आहे अभिनेत्री नीना गुप्ता आहेत. झाले असे की, नीना गुप्ता आणि सतीश कौशिक हे चांगले मित्र होते. त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र कामही केलंय. पण त्यावेळी नीना गुप्ता या वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत लिव्ह-इनमध्ये राहत होत्या. दोघांनी लग्न केले नाही पण नीना गरोदर राहिल्या. त्यानंतर नीना यांनी ठरवलं की त्या बाळाला जन्म द्यायचा. पण निर्णय एवढा सोपा नव्हता. या निर्णयामुळे त्या बराचकाळ तणावात राहिल्या.
त्यावेळी सतीश कौशिक यांनी आपल्या मैत्रिणीला लग्नाची मागणी घातली. तुझ्या बाळासहीत तुला स्वीकारेन असं त्यांनी नीना यांना सांगितलं.
या विषयी सतीश एका मुलाखतीत म्हणाले होते, ' होय, मी बोललो होतो तिला लग्नाबाबत. अगदी काळजी करू नकोस, जर बाळाचा रंग जर सावळा असेल तर सांग की ते बाळ माझं आहे आणि आपण लग्न करू. कुणाला शंका येणार नाही.' असंही म्हणालो होतो.
“पण एक मित्र म्हणून मी फक्त माझं प्रेम व्यक्त केलं होतं. मी तिच्यासाठी चिंतेत होतो. मला तिला एकटं पडू द्यायचं नव्हतं. पण तिने तिच्या पुस्तकात म्हंटलंय की मी तिला प्रपोज केलं. मात्र ती मिक्स फिलिंग होती. ती मस्करी होती, काळजी होती तिचा सन्मान होता. मी माझ्या बेस्ट फ्रेण्डला तिला माझी गरज असताना सपोर्ट केला इतकच.” असे ते म्हणाले होते.