
The Kapil Sharma Show: कपिलच्या शोमध्ये येण्यावर मोदींची मोठी प्रतिक्रिया, आता मी..
कपिल शर्माचा कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' खूप लोकप्रिय आहे. हे काही वेगळ सांगण्याची गरज नाही. हा कॉमेडी शो सर्वांचेच मनोरंजन करतो. कपिलचा शो जरी अनेकदा वादात सापडला असला तरी शोची क्रेझ कधीच कमी झाली नाही.
कपिल शर्माच्या या शोमध्ये आतापर्यंत बॉलीवूडपासून टॉलिवुडपर्यंत, क्रिकेटपासून बॅडमिंटनपर्यंतच नव्हे तर राजकिय नेत्यांनीही या शोला हजेरी लावली आहे.
अनेक सेलिब्रिटींना 'द कपिल शर्मा शो'मध्ये आपल्या शोमध्ये आमंत्रित केले आहे. पण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोमध्ये येण्यासाठी कधी आमंत्रित केले आहे का? कपिल शर्माने अलीकडेच एका मुलाखतीत याचा खुलासा केला आणि त्यावर पंतप्रधानांची प्रतिक्रियाही सांगितली.
अलीकडेच कपिल 'आज तक' च्या शोमध्ये दिसला, जिथे त्याने त्याच्या कारकिर्दीतील चढ-उतारांपासून ते करिअरपर्यंत अनेक खुलासे केले. यावेळी जेव्हा कपिल शर्माला विचारण्यात आले की तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांच्या शोमध्ये कधी आमंत्रित करणार आहे, तेव्हा कॉमेडियनने काय उत्तर दिले हे तुम्हाला माहीत आहे का?
कपिल शर्मा म्हणाला, 'जेव्हा मी पंतप्रधान मोदींना भेटलो तेव्हा मी त्यांना म्हणालो की सर, तुम्ही कधीतरी आमच्या शोमध्ये या. त्यांनी मला नकारही दिला नाही. सध्या माझे विरोधक खूप कॉमेडी करत आहेत... असं काहीसं ते म्हणाले. त्यांनी नकारही दिला नाही. आले तर आमचे भाग्यचं
कपिल शर्मा सध्या त्याच्या झ्विगाटो (Zwigato) या चित्रपटामुळे चर्चेत आहे, जो लवकरच रिलीज होणार आहे. कपिल शर्मा या चित्रपटात डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत असून त्याची व्यक्तिरेखा खूप गंभीर आहे.