Lata Mangeshkar Death Anniversary: लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतीदिन. गेल्या वर्षी २०२२ ला लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड गेल्या. लता मंगेशकर गाणी दररोज आसमंतात गुंजत असतात. लता मंगेशकर आज आपल्यात नसल्या तरीही त्यांचे स्वर आणि गाणी आपल्या मनामनात कायम आहेत. लता मंगेशकर यांनी वयाच्या ५ व्या वर्षी त्यांच्या मृत्यूला चकवा दिला होता.
लतादीदी या ५ वर्षांच्या असताना त्याना कांजण्या झालेल्या. त्यांच्या शरीरावर प्रचंड प्रमाणात कांजण्याचे डाग आले होते. कांजण्या इतक्या प्रचंड होत्या कि, त्यांच्या कुटुंबियातील अनेकांना आता लता जगणार नाही, असे वाटले होते. कांजण्यावर कोणतेही उपचार काम करत नव्हते. लता दिदींच्या कांजण्यामध्ये पू जमा झाला होता.
दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती. ५ वर्षांची असताना त्या लहान वयात लता दीदी प्रचंड वेदना सहन करत होत्या. दीदींच्या आईने लेक लवकर बारी व्हावी म्हणून त्यांना केळीच्या पानात गुंडाळून ठेवले होते. कांजण्यांचा आजार इतक्या प्रचंड ठरला गेलेला कि या आजारादरम्यान लतादीदींच्या नजरेवर परिणाम करून त्या अंध होतील अशी भीती डॉक्टरांना होती.
तब्बल तीन महिने कांजण्याच्या या आजाराने लतादीदी आजारी होत्या. ५ वर्षांची असतानाचा लता दीदी प्रचंड वेदना सहन केल्या. हे तीन महिने त्यांच्या आयुष्यातील अत्यंत त्रासदायक महिने होते. पण लतादीदी यांच्या हातून पुढे एक महान कार्य व्हायचं होतं. अचानक दिवस पालटले आणि मृत्यूच्या दाढेत असलेल्या लताने मृत्यूलाच चकवा दिला
कांजण्यांवर मात करून लता पूर्णपणे ठणठणीत झाली. मंगेशकर कुटुंबियांना प्रचंड आनंद झाला.आनंदाच्या भरात त्यांच्या वडिलांनी बँडवाल्यांना बोलावले. याशिवाय दीदींच्या आईंनी आनंदात धान्य, नारळ आणि महागड्या साड्यांचे वाटप केले. अगदी दिवाळी असावी असं वातावरण मंगेशकर कुटुंबियांच्या घरात निर्माण झालं होतं.
६ फेब्रुवारी २०२२ ला लतादीदी अनंतात विलीन झाल्या. त्या दिवशी संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.