तापाने फणफणत असतानाही नवाजुद्दीन म्हणत होता चित्रपटाचे डायलॉग

पत्नीने घाबरून केला अनुराग कश्यपला फोन
nawazuddin siddiqui
nawazuddin siddiqui
Updated on

बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी Nawazuddin Siddiqui याचा आज वाढदिवस. 'मंटो', 'फोटोग्राफर', 'ठाकरे', 'मांझी', 'रमन राघव २.०' 'गँग्स ऑफ वासेपूर' यांसारख्या चित्रपटांमध्ये नवाजुद्दीनने आपल्या अभिनयाची छाप सोडली. यापैकी 'रमन राघव २.०' Raman Raghav 2.0 या चित्रपटात त्याने मानसिक समतोल बिघडलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. मानसिकदृष्ट्या परिणाम करणाऱ्या या भूमिकेसाठी नवाजुद्दीनने खूप मेहनत घेतली. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप Anurag Kashyap यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, नवाजुद्दीन आजारपणातही चित्रपटाचे संवाद म्हणत होता. (When Nawazuddin Siddiqui kept saying dialogues despite fever)

नवाजुद्दीनची पत्नी आलियाने अनुराग कश्यपला फोन करून सांगितलं होतं की, ताप आला तरी तो सतत चित्रपटातील संवाद म्हणत होता. "नवाजुद्दीनला डेंग्यूचं निदान झालं होतं आणि तो रुग्णालयात दाखल होता. रुग्णालयात असतानाही तो सतत रमन राघवचे संवाद म्हणत होता. तो तापाने फणफणत होता आणि त्या परिस्थितीतही तो फक्त संवाद म्हणत होता. हे पाहून त्याची पत्नीसुद्धा घाबरली होती. त्या भूमिकेसाठी त्याने स्वत:ला अक्षरश: वाहून घेतलं होतं. त्या भूमिकेच्या विश्वातच तो राहत होता", असं अनुराग म्हणाला.

nawazuddin siddiqui
कोणताही गाजावाजा न करता 'अप्सरा' सोनाली अडकली लग्नबंधनात

२०१६ मध्ये 'हफपोस्ट'ला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन त्या घटनेबद्दल व्यक्त झाला. "चित्रपटाचं शूटिंग मुंबईतल्या विविध भागांमध्ये झालं होतं. धारावीतल्या झोपडपट्टीतही शूटिंग करण्यात आलं होतं. त्यामुळे शूटिंगदरम्यान मी आजारी पडलो आणि पाच दिवस रुग्णालयात दाखल होतो. मी शुद्धीवर नव्हतो पण तरीसुद्धा चित्रपटातील माझे संवाद म्हणत होतो. हे पाहून माझी पत्नी घाबरली आणि तिने अनुराग कश्यपला फोन केला होता."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com