
शूट करताना सनीनं दाबला होता अनिल कपूरचा गळा; दिग्दर्शकाची उडालेली घाबरगुंडी
सनी देओल(Sunny Deol) आणि अनिल कपूर(Anil Kpoor) यांनी आपल्या सिनेकारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांत एकमेकांसोबत काम केलं होतं. पण त्यानंतर दोघांनी कधीच एकत्र कुठल्या सिनेमात काम केलं नाही. माहित आहे का? यामागे एक मोठं कारण आहे. ३४ वर्षापूर्वी एका सिनेमाच्या सेटवर एक घटना घडली होती अन् त्यामुळे अनिल कपूर आणि सनी देओल यांनी पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही. अनिल कपूरनं त्या घटनेनंतर सनी देओलवर त्याचा गळा दाबण्याचा आरोप केला होता. अनिल कपूर असं का म्हणाले होते? दोन्ही अभिनेत्यांमध्ये असं काय घडलं होतं? तो कोणता सिनेमा होता? आज आम्ही त्या घटनेविषयी तुम्हाला सांगणार आहोत. आणि त्याबरोबरच सांगू की अनिल कपूर आणि सनी देओल यांच्यातलं नातं कसं बदललं.
हेही वाचा: 'साऊथ स्टार्सवर बॉलीवूडकर जळतात'; राम गोपाल वर्माची 'अजय-किच्चा' वादात उडी
ही घटना घडली होती 'राम अवतार' सिनेमाच्या सेटवर. सनी देओल आणि अनिल कपूर या दोघांना १९८८ साली 'राम अवतार' सिनेमासाठी साइन केलं गेलं. हा सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत दोघे मोठे स्टार बनले होते. दिग्दर्शक सुनील हिंगुरानी या सिनेमाला घेऊन खूपच उत्सुक होते. 'राम अवतार' मध्ये अनिल कपूर आणि सनी देओल व्यतिरिक्त श्रीदेवी,शक्ती कपूर,मणिक ईरानी आणि भारत भूषण महत्त्वाच्या भूमिकेत होते. सिनेमाचं कथानक लहानपणीच्या मित्रांच्या मैत्रीवर आधारित होतं. पण या मित्रांची भूमिका करणाऱ्या सनी आणि अनिल मध्ये मात्र शूटिंग दरम्यान मोठं भांडण झालं.
खरंतर या भांडणाची सुरवात 'जोशीले' सिनेमाच्या सेटवरच झाली होती. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर त्याचं झालं असं की, सनी देओल आणि अनिल कपूर यांचा एकत्र 'जोशीले' हा पहिलाच सिनेमा होता. बोललं जातं की या सिनेमाच्या क्रेडिट लाइनमध्ये जेव्हा अनिल कपूरचं नाव सनी देओलच्या आधी आलं तेव्हा सनीला हे पटलं नव्हतं. त्याला वाईट वाटलेलं आणि म्हणे तो भडकला देखील होता. तेव्हा सनी देओलनं अनिल कपूरला काही सांगितलं नसलं तरी पण कुठे ना कुठे त्याच्या मनात खदखद होतीच.

Ram Avtaar Scene - Anil Kapoor, Shridevi And Anil Kapoor
ही खदखद राग बनून बाहेर तेव्हा आली जेव्हा 'राम अवतार' सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. बोललं जातं की सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सनी देओल आणि अनिल कपूरने एकमेकांशी बातचीतही केली नाही. पण जेव्हा फाइट सीन शूट करायचे होते तेव्हा वातवरण तणावाचं अधिक बनलं. सूत्रांच्या माहितीनुसार,कथेनुसार सनी देओला अनिल कपूरचा गळा पकडायचा होता. पण तेव्हा काय झालं माहित नाही,सनी देओलनं भान हरपलं आणि जवळपास अनिल कपूरचा गळाच दाबायला सुरुवात केली ज्यामुळे अनिल कपूरला श्वास घ्यायला त्रास झाला.
हेही वाचा: थिएटरआधी आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' पोहोचला रेडिओवर; 'कहाणी' लीक की रीलिज?
सेटवर त्यामुळे गोंधळ झाला. दिग्दर्शकानं देखील लगेच कट म्हटलं,म्हणतच राहिला पण सनी देओलने अनिल कपूरचा गळा सोडलाच नाही. कसंतरी दोघांना वेगळं केलं. सेटवर तेव्हा हजर असलेला प्रत्येकजण सनी देओलच्या या कृत्यानं घाबरला होता. अनिल कपूरची तर वाईट अवस्था झाली होती. तो खूप चिडला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळतंय की,त्या घटनेनंतर अनिल कपूर यांनी सनी देओलवर गळा दाबण्याचा आरोप केला होता.
Web Title: When Sunny Deol Lost His Patience And Strangled Anil Kapoor During The Shooting Of Ram
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..