विल स्मिथला किस करणं पत्रकाराला पडलं होतं महागात,जुनं 'थप्पड' प्रकरण चर्चेतOscar 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

When Will Smith slapped a reporter who tried to kiss him at Men in Black 3 premiere. Old video goes viral

विल स्मिथला किस करणं पत्रकाराला पडलं होतं महागात,जुनं 'थप्पड' प्रकरण चर्चेत

ऑस्कर २०२२ (Oscar 2022) पुरस्कार सोहळा भले संपला असला तरी अजूनही सोशल मीडियावर मात्र या सोहळ्यातील 'थप्पड' प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. ज्याप्रकारे अभिनेता विल स्मिथनं(Will SMith) सगळ्यांसमक्ष अचानक मंचावर जाऊन शो चा सूत्रसंचालक कॉमेडियन क्रिस रॉक च्या कानशिलात लगावली ते सर्वांसाठीच शॉकिंग होतं. आण कदाचित या 'थप्पड' प्रकरणामुळेच यंदाचा ऑस्कर सोहळा अधिक लक्षात राहीला. भले क्रिसच्या कानाखाली लगावल्यावर स्मिथनं माफी मागितली असेल तरी स्मिथचा एक जुना व्हिडीओ आता व्हायरल झालाय ज्यामुळे या प्रकरणाला अजूनच वेगळा रंग मिळताना दिसतोय. या व्हिडीओत स्मिथ चक्क एका पत्रकाराला धक्काबुक्की करताना दिसत आहे. आता याचं कारण थोडंसं हटके आहे पण चर्चा तर रंगली ना. आता त्या व्हिडीओत जे स्मिथसोबत घडलेलं दिसत आहे ते जर इतर कोणासोबत झालं असतं तर कदाचित ती व्यक्ती देखील स्मिथ सारखीच रिअॅक्ट झाली असती. तर चला जाणून घ्या की विल स्मिथनं का केली पत्रकाराला धक्काबुक्की.

हा व्हिडीओ तसा फार जुना आहे. २०१२ मध्ये 'मेन इन ब्लॅक 3'च्या प्रीमियर दरम्यानं हे घडलं होतं. पत्रकारांशी मुलाखतीच्या निमित्तानं संवाद साधताना एका पुरुष पत्रकारानं अचानक स्मिथला किस करायचा प्रयत्न केला. त्यावेळी स्मिथनं त्याच्या किस पासून वाचण्यासाठी आपला चेहरा त्याच्यापासून लांब नेण्याच्या प्रयत्न एकदम आवेगात केला. पण शेवटी त्या पत्रकारानं त्याच्या गालावर किस केलंच. ज्यानंतर विल स्मिथनं एकदम जोरात पत्रकाराला आपल्यापासनं दूर हटवलं. आणि रागात त्याच्या कानशिलातही लगावली. पण व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की विल स्मिथनं केवळ स्वतःचं त्या पत्रकाराच्या किस पासून रक्षण करण्यासाठी अनपेक्षितपणे ते केलं होतं.

हेही वाचा: पुण्यात कास्टिंग डायरेक्टरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

त्यानंतर स्मिथनं हसत-हसत माफी मागितली होती. तो म्हणाला होता,''मला त्यानं गालावर किस केलं म्हणून मी असा वागलो''. आणि विनोदानं म्हणाला देखील,''जोकरचं नशीब, मी मुक्का नाही मारला त्याला''. आणि पुढे तो आय अॅम सॉरी देखील म्हणाला होता. स्मिथचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडीओवर त्याचे चाहते मात्र म्हणत आहेत, ''नाही,नाही,हे पाहणं खूप मजेदार होतं''. हा व्हिडीओ हॉलीवूड नावाच्या यू ट्युब चॅनलने शेअर केला आहे.

'ऑस्कर २०२२' मधील या 'थप्पड' प्रकरणाविषयी थोडक्यात सांगायचं तर,या शो चं सूत्रसंचालन करणाऱ्या क्रिस रॉकनं अभिनेता विल स्मिथची पत्नी जेडा विंकेटची तिच्या केसावरनं खिल्ली उडवली अन् त्याचाच राग येऊन स्मिथनं रॉकला जोरात कानशिलात लगावली तेहीअगदी मंचावर जाऊन सगळ्यांसमोर. स्मिथची पत्नी जेडा केसांच्या आजाराचा सामना करत असल्यामुळे तिचे सगळे केस गळाले आहेत. त्यामुळे तीनं तिचे डोक्यावरचे सगळेच केस कापले आहेत.

Web Title: When Will Smith Slapped A Reporter Who Tried To Kiss Him At Men In Black 3 Premiere Old Video Goes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..