
शाळेत असताना Ranbir Kapoor च्या 'या' कृतीने थेट प्रिन्सिपल सरांनी त्याला भर वर्गासमोर फटकावलं
Ranbir Kapoor News: बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा तू झूठी मैं मक्कार हा सिनेमा रिलीजच्या मार्गावर आहे. दोघांच्या रोमँटिक कॉमेडी सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने रणबीर कपिल शर्मा शो मध्ये आला होता.
त्यावेळी रणबीरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे केले. बोलताना रणबीरने त्याच्या शालेय जीवनात घडलेल्या आठवणीचा उल्लेख केला.
(While in school, Ranbir Kapoor act got him directly slapped by the principal sir)
रणबीरने एक कृती केली होती ज्यामुळे त्याला थेट प्रिन्सिपल सरांचा मार खावा लागला. रणबीरने खुलासा केला कि.. “मला आठवतंय आमचं लेक्चर चालू होता.. असा पिरियड चालू होता की खूप कंटाळा आला होता, म्हणून मी वर्गाच्या बाहेर असाच डोकावतो.
माझे डोके बाहेर उभे होते. तेव्हा मी वर पाहिले तेव्हा प्रिन्सिपल सर उभे होते. आणि मग नंतर त्यांनी मला जोरात कानाखाली मारली."
रणबीर हा मजेदार प्रसंग आठवताना पुढे म्हणाला कि.. "पुढे सरांनी माझे कान धरले आणि कॉरिडॉरच्या दिशेने मला घेऊन गेले. नंतर त्यांनी माझे केस पकडले आणि त्यांनी मला वर्गात आणून पुन्हा फटकावलं."
रणबीर हि घटना सांगताना कपिल शर्मा शो मध्ये उपस्थित प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट झाली. रणबीर आणि श्रद्धा यांनी त्याच्या आयुष्यातील असाच गमतीशीर घटनांचा खुलासा केला.
रणबीर लवकरच श्रद्धा कपूरसोबत तू झूठी मैं मक्कार या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय आगामी प्रोजेक्ट्समध्ये रणबीर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सोबत संदीप रेड्डी वंगा यांचा अॅनिमल सिनेमात झळकणार आहे.
२०२३ च्या अखेरीस प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात अनिल कपूर आणि बॉबी देओल यांचीही भूमिका आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये रणबीर कपूरचा ब्रम्हास्त्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला.
रियल लाईफमध्ये रणबीरने अभिनेत्री आलीय भट सोबत लग्न केलं असून या दोघांना राहा हि मुलगी आहे.