सिद्धार्थच्या आठवणीत शहनाज माध्यमांसमोर ढसाढसा रडली | Shehnaaz Gill | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shehnaaz Gill

सिद्धार्थच्या आठवणीत शहनाज माध्यमांसमोर ढसाढसा रडली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

काही महिन्यांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं Siddharth Shukla निधन झालं. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याची मैत्रीण शहनाज गिल Shehnaaz Gill पूर्णपणे खचली होती. बिग बॉस १३ मध्ये शहनाज आणि सिद्धार्थला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं होतं. त्या दोघांनी म्युझिक अल्बममध्येही एकत्र काम केलं होतं. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजने काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र त्याचदरम्यान तिचा 'हौंसला रख' हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. म्हणून तिला प्रमोशननिमित्त विविध कार्यक्रमांमध्ये हजर राहावं लागलं. अशाच एका कार्यक्रमात शहनाज सिद्धार्थच्या आठवणीत भावूक झाली. शहनाजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज काही काळ सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. नुकतीच ती दिलजीत दोसांझसोबत ‘हौसला रख’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली. प्रमोशनच्या कार्यक्रमातील तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये तिला सिद्धार्थच्या आठवणीत रडू कोसळल्याचं पहायला मिळतंय. हा व्हिडीओ पाहून 'सिडनाज'चे चाहतेसुद्धा हळहळले. चाहत्यांनीच या जोडीला 'सिडनाज' असं नाव दिलं होतं. काही दिवसांपूर्वी तिने सिद्धार्थसाठी ‘तू यहीं है’ हे गाणं समर्पित केलं होतं. या गाण्यात सिद्धार्थच्या अनेक आठवणी पुन्हा एकदा चाहत्यांना पहायला मिळाल्या होत्या.

हेही वाचा: राजकुमार-पत्रलेखाच्या लग्नाचा अल्बम

बिग बॉस'च्या घरात सिद्धार्थ आणि शहनाज या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. सिद्धार्थ आणि शहनाज यांच्या मैत्रीची सतत सोशल मीडियावर चर्चा होत असे. सिद्धार्थ-शहनाजच्या चाहत्यांमध्ये #sidnazz हा हॅशटॅग प्रसिद्ध आहे. सिद्धार्थने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 'बाबुल का आंगन छुटे ना' या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'जाने पहचाने से.. ये अजनबी', 'लव्ह यू जिंदगी' यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या. मात्र 'बालिका वधू' या मालिकेतील भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला होता.

loading image
go to top