सुहाना करतीये 'त्याच्या'सोबत डेटिंग...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

एवढे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे ‘किंग ऑफ रोमान्स’ असणाऱ्या शाहरूखची मुलगीही आता प्रेमात पडलीय म्हणे!

नुकतेच आयपीएलचे सामने संपले. त्यात आपण पाहिले, की शाहरूख खान त्याच्या ‘कोलकाता नाईट रायडर्स’च्या टीमला चिअरअप करायला नेहमीच हजर असायचा. पण जेव्हा शाहरूख थोडासा बिझी असायचा, तेव्हा त्याची मुलगी सुहाना आपल्या वडिलांची जागा घेत आपल्या आयपीएल टीमला चिअर करायची.

shubhaman gill and suhana khan

एवढे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे ‘किंग ऑफ रोमान्स’ असणाऱ्या शाहरूखची मुलगीही आता प्रेमात पडलीय म्हणे! कोलकाता नाईट रायडर्सचा एक खेळाडू शुभमन गिल आणि सुहाना अनेक वेळा एकत्र दिसले होते. त्यामुळे सुहाना शुभमनला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. शुभमन गिलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. सुहाना आणि त्याच्यामध्ये मैत्री वाढल्याचं कळतंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who dates with suhana khan

टॅग्स