KGF 2 : सिनेमाचा एडिटर आहे 19 वर्षीय मराठी मुलगा; कोण आहे उज्जवल कुलकर्णी? KGF Chapter 2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Who Is Ujjwal Kulkarni? Man Behind KGF: Chapter 2’s Editor

KGF 2 : सिनेमाचा एडिटर आहे 19 वर्षीय मराठी मुलगा; कोण आहे उज्जवल कुलकर्णी?

सध्या बॉक्सऑफिसवर(BoxOffice) दाक्षिणात्य सिनेमांचा डंका आहे. यांच्यापुढे भल्याभल्या बॉलीवूड सिनेमांनीही नांगी टाकलेली आपण पाहिली असेलच. भारतातच नाही तर जगभरात या दक्षिणेकडच्या सिनेमांनी नुसता धुमाकूळ घातला आहे. आधी अल्लू अर्जुनचा 'पुष्पा', मग रामचरण आणि ज्यु,एनडीआरचा 'RRR' आणि आता यशचा 'KGF Chapter-2', बॉक्सऑफिसवरच्या यांच्या कमाईचा आकडा वाढतानाच दिसत आहे. पण एक गोष्ट या सिनेमांच्या बाबतीत प्रामुख्यानं आढळून आली ती म्हणजे या बिग बजेटवाल्या दाक्षिणात्य सिनेमांशी एक तरी मराठी नाव जोडलं गेलंय अन् ज्याच्या कामामुळं सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याची देखील चर्चा आहे. श्रेयस तळपदेनं अल्लू अर्जूनसाठी केलेलं हिंदी डबिंग असू दे की आता सचिन गोळेनं केजीएफ चॅप्टर २ साठी केलेलं हिंदी डबिंग असू दे,यामुळे प्रत्येक मराठी मनाची मान मात्र उंचावलीय. आता केजीएफ बाबतीत आणखी एक गोष्ट कळली आहे ती म्हणजे वीएफएक्स आणि एडिटिंगसाठी पंसत केल्या जाणाऱ्या या सिनेमाचं एडिटर चक्क एक १९ वर्षीय मराठी मुलगा आहे. आता प्रत्येक मराठी प्रेक्षकाला याविषयी नक्कीच जाणून घ्यायचं असेल. की कोण आहे १९ वर्षीय उज्जवल कुलकर्णी?(Ujjwal Kulkarni)

हेही वाचा: मराठी माणसाला लाजवणारं आमिरच बोलणं ऐकलंय? व्हिडीओ व्हायरल

१९ वर्षीय उज्जवल कुलकर्णी हा खरंतर शॉर्ट फिल्म एडिट करायचा, ज्याला केजीएफ चॅप्टर २ सारखा मोठा सिनेमा एडिट करण्याची संधी मिळाली. जेव्हा सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांना उज्ज्वल विषयी माहित झालं तेव्हा ते त्याच्या कामावर खूपच इंप्रेस झाले. आणि त्यांनी केजीएफ संदर्भात एक मोठा निर्णय घेत सिनेमाच्या एडिटिंगची महत्त्वाची जबाबदारी उज्ज्वल कुलकर्णीवर सोपवली.

हेही वाचा: मंदाना करिमीनं घेतलं अनुराग कश्यपचं नाव; म्हणाली,'माझ्या गर्भपाताला तो...'

उज्ज्वलसाठी हा पहिला मोठा प्रोजेक्ट होता, जिथे तो इतक्या मोठ्या सिनेमाचं एडिटर म्हणून काम पाहणार होता, तेही वयाच्या फक्त १९ व्या वर्षी. अन्यथा इथवर मजल मारायची म्हणजे चाळीशीला यावं लागतं सिनेइंडस्ट्रीत,कधीकधी तर तशी संधीच मिळत नाही अगदी खूप कष्ट घेऊनही. उज्जवलनं याआधी शॉर्ट फिल्म्स आणि युट्यूब वरील फॅन मेड मूव्हीज एडिट केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार,दिग्दर्शक प्रशांत नीलनं केजीएफ चॅप्टर २ चं शूटिंग आधी पूर्ण केलं . त्यानंतर उज्ज्वलने आपलं एडिटिंग कौशल्य प्रशांत नील यांना दाखवण्यासाठी आधी एक सिनेमाचा ट्रेलर बनवला. तो ट्रेलर प्रशांत नील यांना इतका आवडला की त्यांनी केजीएफ चॅप्टर २ सिनेमा संपूर्ण एडिट करण्याची जबाबदारीच उज्ज्वल कुलकर्णीवर सोपवली.

हेही वाचा: डोक्यावर पीसं लावून फिरताना दिसली राखी; आदिवासींनी थेट पोलिस ठाण्यात नेलं

केजीएक चॅप्टर २ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचं झालं तर या सिनेमानं जगभरात प्रदर्शित झाल्यापासून ६०० करोड बॉक्सऑफिसवर कमावले आहेत. सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला अधिक पसंत केलं जात आहे. या सिनेमात दाक्षिणात्या सुपरस्टार यश आणि सोबत बॉलीवूड सुपरस्टार संजय दत्त(Sanjay Dutt) ,रविना टंडन,श्रीनिधी शेट्टी यांनी महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्यात. हा संजय दत्तचा पहिला तेलुगू सिनेमा आहे.

Web Title: Who Is Ujjwal Kulkarni Man Behind Kgf Chapter 2s

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top