कश्‍मिरी गर्लचा सोबती कोण? 

भक्ती परब  
मंगळवार, 27 जून 2017

मेघना गुलजारच्या "तलवार' सिनेमानंतर "राजी' या सिनेमाविषयी जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. या सिनेमात काम करण्यासाठी आलिया भट्टने होकार दिल्यानंतर या सिनेमात पाकिस्तानी लष्करी अधिकारी कोण बनणार, याची चर्चा होती.

पण आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. "मसान'फेम विकी कौशल या सिनेमात पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमासाठी कश्‍मिरी गर्लला विकीच्या रूपात नवा सोबती मिळाला आहे. पहिल्यांदाच ही जोडी एकत्र येत आहे. जुलैमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होईल.

याविषयी विकी म्हणाला, की मेघना गुलजारसोबत काम करणं हे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. त्याचबरोबर आलिया भट्ट ही आताच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करण्याचाही आनंद आहेच. आलियाच्या "राजी' या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. ती स्वतः खूपच मेहनत घेतेय. ती म्हणाली की, माझ्यासाठी हा सिनेमा खूप खास आहे. मी माझ्याकडून कुठलीही कसर बाकी ठेवणार नाही. 
 
Web Title: Who is a Kashmiri girl?