Bigg boss 4: बिग बॉस मराठीची ट्रॉफी कुणाकडे जाणार? ही चार नावं फायनल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4:

Bigg boss 4: बिग बॉस मराठीची ट्रॉफी कुणाकडे जाणार? ही चार नावं फायनल..

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीचा हा शो चांगलाच गाजत आहे. हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आता हा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांनी अनेक राडे, वाद, भांडणं पाहिली.

हेही वाचा: Sushant Singh Rajput: 'सुशांत मृत्यूमागे मागे मोठं षडयंत्र'... वकिलाचा गौप्यस्फोट

अगदी किरण- विकास सारखे मित्र एकमेकांच्या कट्टर विरोधात जातानाही पाहिले त्याचबरोबर राखी आल्यानंतर शोमध्ये रोजचं काही तरी वेगळं पाहिला मिळालं. 80 हून अधिक दिवस घरात एकत्र राहिलेले ही सदस्य काही दिवसातच बिग बॉसचा खेळ जिंकून आपल्या घरी जाणार आहेत.आता हा स्पर्धक कोणं असणार याकडे प्रेक्षकाच्या नजरा लागल्या आहेत.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: हे व्हायचच होतं! अक्षय अपूर्वामध्ये जोरदार भांडण..

त्यातच आता यंदाच्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याची तारीखही जाहीर झाली आहे. ८ जानेवारीला बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा पार पडणार असल्याच्या चर्चा आहे. आता घरात राखी सावंत, आरोह वेलणकर, किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, हे सदस्य राहिले आहेत. आरोह वेलणकर हा तर घरातला कॅप्टन झाला आहे त्यामूळं तो नॉमिनेशनच्या बाहेर आहे. नॉमिनेशन बाबत बोलायचं झालं तर प्रसाद, अमृता आणि राखी हे तिघेही नॉमिनेट झाले.

हेही वाचा:जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

तर दुसरीकडे किरण माने, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, आरोह वेलणकर हे सदस्य सेफ झाले त्यामूळं आता हे चौघेजण बिग बॉसच्या घरातील टॉप चार फायनलिस्ट ठरले. आता या बिगबॉसला त्याचा चार जणांपैकी एक व्यक्ती या पर्वाचा विजेता असेलं. यात अपूर्वा नेमळेकरचं पारडं जड वाटतं असल्यानं कोणाला प्रेक्षकं मत देवून जिंकवतील याकडे सर्वाचें लक्ष लागले आहे.