Bollywood चे सिनेमे बॉक्सऑफिसवर फ्लॉप, अनुराग कश्यप जरा स्पष्टच बोलला...Anurag kashyap | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Why are Hindi movies beating at the box office? Anurag Kashyap said

Bollywood चे सिनेमे बॉक्सऑफिसवर फ्लॉप, अनुराग कश्यप जरा स्पष्टच बोलला...

अनुराम कश्यप(Anurag Kashyap) सध्या त्याच्या 'दोबारा'(Dobara) सिनेमामुळे चर्चेत आहे. अनुराग कश्यपच्या या सिनेमात तापसी पन्नू(Taapsee Pannu) मध्यवर्ती भूमिकेत काम करत आहे. दोबाराच्या ट्रेलर लॉंचच्या वेळी हिंदी सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर चांगले प्रदर्शन का करत नाहीत, का फ्लॉप होतायत यावर अनुराग कश्यपने थेट भाष्य केलं आहे.(Why are Hindi movies beating at the box office? Anurag Kashyap said)

हेही वाचा: Shamshera फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया,म्हणाला,'मी माफी मागतो..'

अनुराग कश्यपने हिंदी सिनेमे फ्लॉप होण्याचं कारण सांगताना म्हटलं आहे की, आजकाल हिंदी सिनेमांचा मूळ गाभा दिग्दर्शक विसरत चालले आहेत. लोकांना इम्प्रेस करण्याच्या नादात आपली मूळ शैली सोडून ते भरकटत आहेत आणि ती गोष्ट मास पब्लिकला मग कळतच नाही. तामिळ,तेलुगु,मल्याळम सिनेमे आजही आपल्या संस्कृतीशी जोडलेले आहेत,ते मेनस्ट्रीम कल्चर असू दे की नॉन मेनस्ट्रीम कल्चर. पण हिंदी सिनेमांच्या बाबतीत तंस होताना दिसत नाही.

हेही वाचा: Tiger Shroff वर एकतर्फी प्रेम करायची दिशा? अभिनेत्रीची जुनी मुलाखत चर्चेत

अनुराग कश्यप पुढे म्हणाला,हिंदी सिनेइंडस्ट्रीत आता असे दिग्दर्शक आहेत, ज्यांना धड हिंदी देखील बोलता येत नाही आणि तेच त्यांच्या सिनेमात मग दिसतं. जे इंग्लिश बोलतात,ते हिंदी सिनेमे बनवत आहेत.

हेही वाचा: Tiger Shroff वर एकतर्फी प्रेम करायची दिशा? अभिनेत्रीची जुनी मुलाखत चर्चेत

अनुराग कश्यपचं म्हणणं आहे की,जेव्हा मेनस्ट्रीम दिग्दर्शक आपल्या मातीशी जोडलेल्या संस्कृतीचे ,आपल्या स्टाईलचे सिनेमे बनवतील,तेव्हा ते नक्की चालतील. त्यानं संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाडी आणि अनिस बझ्मीच्या भूलभूलैय्या २ चं उदाहरण यावेळी दिलं. हेच दोन सिनेमे आहेत जे कोरोनाचा प्रादुर्भाव अजून थांबला नसतानाही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकले आहेत.

हेही वाचा: शमशेरा फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया, म्हणाला,'मी माफी मागतो...'

दोबारा सिनेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या सिनेमाच्या माध्यमातून तापसी पन्नू आणि अनुराम कश्यप ही दमदार जोडी मोठ्या पडद्यावर परत येतेय. दोबारा सिनेमा २०१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश मिराज सिनेमाचा रीमेक आहे. सिनेमाची कहाणी तापसी भोवती फिरताना दिसणार आहे. हा सिनेमा १९ ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

Web Title: Why Are Hindi Movies Beating At The Box Office Anurag Kashyap Said

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top