महेश मांजरेकर यांनी 'बिग बॉस मराठी ३'मधून का घेतली माघार? Mahesh Manjrekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Manjrekar

महेश मांजरेकर यांनी 'बिग बॉस मराठी ३'मधून का घेतली माघार?

कलर्स मराठी वाहिनीवरील 'बिग बॉस मराठी ३' (Bigg Boss Marathi 3) या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. मात्र अवघ्या काही दिवसांत हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या घरातील सात स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. त्यापैकी एक जण बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे. अशातच या शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी माघार घेतल्याचं कळतंय. ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर असताना महेश मांजरेकर यांनी सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता सिद्धार्थ जाधवकडे सोपवली आहे. त्यामुळे नेमकं काय झालंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनपासून महेश मांजरेकर सूत्रसंचालन करत आहेत. त्यांच्या सूत्रसंचालनाची स्टाइल प्रेक्षकांना फारच आवडते. चावडीच्या एपिसोड्समध्ये ते प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात तर स्पर्धकांनाही योग्य दिशा दाखवतात. गेल्या आठवड्यात मांजरेकर यांनी सिद्धार्थकडे सूत्रसंचालन सोपवल्याने आता ते पुन्हा दिसणार की नाही, अशी चर्चा होत आहे. महेश मांजरेकर यांनी तब्येतीच्या कारणास्तव शोमधून माघार घेतल्याचंही म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर कर्करोगाची शस्त्रक्रिया पार पडली होती.

हेही वाचा: 'कमरेचं, छातीचं माप विचारून..'; सुरवीनने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

'ई टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार येत्या २६ डिसेंबर रोजी हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या शोचे निर्माते सध्या ग्रँड फिनालेसाठी जोरदार तयारी करत आहेत. या सिझनच्या ग्रँड फिनालेमध्ये प्रेक्षकांना एक छोटासा बदलसुद्धा पहायला मिळणार आहे. पहिल्या दोन सिझनमध्ये पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले होते. मात्र यंदाच्या सिझनमध्ये पाच नव्हे तर सहा स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंतचा प्रवास करणार असल्याचं कळतंय. २७ डिसेंबरपासून बिग बॉस मराठी ३च्या जागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता ही मालिका प्रसारित होणार असून या मालिकेद्वारे अभिनेत्री भार्गवी चिरमुले छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

Web Title: Why Bigg Boss Marathi 3 Host Mahesh Manjrekar Step Back Before Grand Finale

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..