निखिल राऊतला का कोसळले रडू? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

चित्रपटसृष्टीत कलाकाराने साकारलेल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या डोळयात अश्रू आले की, त्या कलाकाराला कलेच्या यशाची पावती मिळली असे म्हणतात. अशीच यशाची पावती अभिनेता निखिल राउत याला मिळाली आहे.

चित्रपटसृष्टीत कलाकाराने साकारलेल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या डोळयात अश्रू आले की, त्या कलाकाराला कलेच्या यशाची पावती मिळली असे म्हणतात. अशीच यशाची पावती अभिनेता निखिल राउत याला मिळाली आहे.

निखिलने हा पुण्यातील नाटयगृहात चॅलेंज या नाटकामध्ये विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारली. त्याच्या या नाटकाच्या प्रयोगावेळी त्याची ही भूमिका पाहून प्रेक्षक इतके भारावले की, त्यांच्या डोळयातून अश्रू वाहू लागले. एवढेच नाही तर, प्रयोगानंतर काही प्रेक्षकांनी त्याला प्रत्यक्षात भेटून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्याचबरोबर आणखी एका चाहत्याने त्याची ही भूमिका पाहून निखिल आणि दिग्पाल याला पैशाचे पाकीट देऊ केले.

चाहत्यांच्या या प्रेमाविषयी निखिल सांगतो, नट आणि कलाकार म्हणून जेव्हा एखादी कलाकृती अगदी मनापासून, श्रध्देने, निष्ठने सादर करतो आणि रंगभूमीची प्रामाणिकपणे सेवा करतो तेव्हा ती रंगभूमी सुध्दा त्या कलाकाराला खूप भरभरून देत असते. तसेच 'तात्याराव' नमस्कार करतो म्हणत अक्षरश: चप्पल काढून पाया पडले आणि रडले. त्यांच्या या प्रेमामुळे मी पण गहिवरून गेलो होतो. अशा या महान व्यक्तीची भूमिका करण्याचं प्रचंड दडपण आलं होतं, परंतु प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे खूप आनंद वाटत आहे. खरं तर अशी भूमिका मिळायला भाग्य लागतं.

Web Title: why nikhil raut is crying